Tarun Bharat

तामिळनाडूहून येणाऱ्यांना नकारात्मक अहवाल बंधनकारक

बेंगळूर/प्रतिनिधी

कोरोना संक्रमणामध्ये वाढ झाल्यामुळे मंगळवारपासून राज्यात काही नियम कठोर केले जात आहेत. तामिळनाडूहून बेंगळूरला परतण्यासाठी नकारात्मक अहवाल आणणे बंधनकारक आहे. हा अहवाल सकारात्मक आढळल्यास त्यांना परत पाठवले जाईल. नगरपालिका, पोलीस, उत्पादन शुल्क व जिल्हा प्रशासन कोरोना विषयक तपासणी करतील. यासाठी प्रवाशांना सहकार्य करावे लागणार आहे.

दरम्यान राज्यात वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता प्रशासनाने आजपासून काही नियम कडक केले आहेत. तामिळनाडूहून बेंगळूर येथे येणाऱ्यांना सोबत नकारात्मक अहवाल आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. बेंगळूर शहरी जिल्हाधिकारी मंजुनाथ यांनी, जिल्ह्यात वेगाने होणार्‍या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आणि बृह बेंगळूर महानगरपालिकेने (बीबीएमपी) अनेक व्यवस्था केली आहे.

मंगळवारी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी गेले आहेत. त्यांना बेंगळूरमध्ये परत येण्यासाठी नकारात्मक अहवाल असणे आता अनिवार्य झाले आहे. हा अहवाल सकारात्मक आढळल्यास त्यांना परत पाठवले जाईल. यासाठी पालिका, पोलीस, उत्पादन शुल्क व जिल्हा प्रशासन कोविड तपास करतील. यात प्रवाशांना सहकार्य करावे लागेल. अनेकाळ तहसीलमध्ये २३६ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच चेकपोस्टवर वाहने तपासली जात आहेत.

Related Stories

सीमाभाग महाराष्ट्राचाच; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला पुरावा

Archana Banage

हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढू नका

Amit Kulkarni

चार महसूल विभागांत सैनिक वसती शाळा सुरू करणार

Amit Kulkarni

उडुपी: पदुबिद्री समुद्रकिनारा १७ डिसेंबरपासून खुला होणार

Archana Banage

कधीतरी चित्रपटावर चर्चा करा

Archana Banage

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाखाहून अधिक

Archana Banage