Tarun Bharat

तामिळनाडू : गेल्या 24 तासात 5,175 नवे कोरोना रुग्ण; तर 112 मृत्यू

ऑनलाईन टीम / चेन्नई : ही

देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच तामिळनाडूमध्ये गेल्या 24 तासात 5 हजार 175 नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 73 हजार 460 वर पोहोचली आहे.

त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 6031 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर आतापर्यंत 2 लाख 14 हजार 815 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

तर कालच्या दिवसात 112 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 4 हजार 461 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्यस्थितीत राज्यात 54 हजार 184 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, बुधवारी 61,166 रुग्णांचे नमुने घेण्यात आले त्यातील 59,156 जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण 29 लाख 53 हजार 561 जणांचे नमुने घेण्यात आले असून त्यातील 28 लाख 45 हजार 406 जणांची तपासणी केली आहे.

Related Stories

मोरबी पूल दुर्घटनेबाबत पालिकेला चूक मान्य

Amit Kulkarni

‘इंडियन कोरोना’ म्हणणं पडलं महागात; काँग्रेस नेते कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Archana Banage

जिल्हा वार्षिक योजनेचा 359 कोटीचा आराखडा-पालकमंत्री जयंत पाटील

Abhijeet Khandekar

योगी पुन्हा मुख्यमंत्री होणे अत्यावश्यक

Patil_p

मासेमारीच्या अटी रद्द करा, मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Khandekar

”मैत्री कोणाशी करायची हे वाघ ठरवतो, मात्र वेळ पडल्यास तो पंजाही मारू शकतो”

Archana Banage