Tarun Bharat

तारांमध्ये अडकलेल्या पक्ष्यासाठी आणले हेलिकॉप्टर

Advertisements

वाचविला पक्ष्याचा जीव

आकाशात उडणारे पक्षी कधीकधी संकटात सापडतात. पतंगबाजीचा मांजा असो किंवा आकाशात लटकणाऱया विजेच्या तारा यांच्यात गुरफटून अनेकदा पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. पण काही देशांमध्ये पक्ष्यांचे जीवन इतके महत्त्वाचे मानले जाते कीही त्यांना वाचविण्यासाठी हेलिकॉप्टरचा देखील वापर केला जातो. सोशल मीडियावर अशाच एका बचावमोहिमेची चित्रफित व्हायरल होत आहे. ही चित्रफित पाहून पक्ष्याला वाचविणाऱया पथकाचे कौतुक होत आहे. तसेच इतरांना त्यांच्याकडून शिकवण घेण्याची सूचनाही केली जात आहे.

ही चित्रफित इन्स्टाग्रामवरील ऍट्स गॅलरी या पेजवरून शेअर करण्यात आली. या चित्रफितीला आतापर्यंत 3 लाख ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच शेकडो युजर्सनी प्रतिक्रियाही दिली आहे.

चित्रफितीत एक व्यक्ती हेलिकॉप्टरशी जोडले गेलेल्या स्ट्रक्चरवर बसल्याचे आणि त्याच्यासमोर वीजेच्या तारांमध्ये पक्षी अडकून पडल्याचे दिसून येते. हेलिकॉप्टरवरील व्यक्ती तारांच्या नजीक जातो आणि त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक पक्ष्याला एका बॅगेत ठेवतो आणि तारांमध्ये अडकविलेला हुक काढल्यावर हेलिकॉप्टर तेथून निघून जात असल्याचे चित्रफितीत दिसून येते. ही चित्रफित कधी तयार करण्यात आली हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

अमेरिकेच्या व्हर्जिनिया बीचवरील हा प्रकार असल्याचे समजते. तेथील वीजेच्या तारांमध्ये एक सीगल पक्षी अडकला होता. व्हर्जिनया डॉमिनियन पॉवर क्रूने हेलिकॉप्टरच्या मदतीने त्याला वाचविले आहे.

Related Stories

कचऱयाला कलाकृतीत बदलणारी महिला

Patil_p

18 फूट लांबीचे पेन

Patil_p

बर्फातून वाट काढत गर्भवती महिलेला जवानांनी पोहोचवले रुग्णालयात

prashant_c

माकडाला लागले शिक्षणाचे वेध

Patil_p

वाचनात माणूस घडविण्याचे सामर्थ्य : उद्धव साळवे

prashant_c

‘दगडूशेठ’ च्या श्रीं चे विसर्जन व सांगता मुख्य मंदिरातच

Rohan_P
error: Content is protected !!