Tarun Bharat

तारापूर एमआयडीसीतील कंपनी जळून खाक

ऑनलाईन टीम / मुंबई :

तारापूर एमआयडीसीतील रंग आणि रसायने बनवण्याचा कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत कंपनी पूर्णत: जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही आग लागली असून, घटनास्थळी तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तारापूर एमआयडीसीतील प्लॉट नं. एल 9/4 मध्ये रंग रसायन बनवणाऱया कंपनीत मध्यरात्री दोनच्या सुमारास स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीने काही क्षणात रुद्र रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच तारापूर एमआयडीसी अग्निशमन दलाच्या तीन गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. गणेशचतुर्थीची सुट्टी असल्याने कंपनी बंद असल्याने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Related Stories

एसटी कर्मचार्‍यांना २० दिवस सक्तीची रजा म्हणजे जिझीया कर

Archana Banage

राज्यपालांच्या ‘त्या’ पत्राला उद्धव ठाकरेंचं उत्तर

Archana Banage

चिखलीकरांच्या मदतीमुळे माणुसकी जिवंत राहिल्याचे अधोरेखित : जिल्हाधिकारी देसाई

Archana Banage

आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी…; अभिनेते प्रकाश राज यांचे उद्धव ठाकरेंसाठी ट्वीट

Archana Banage

घरगुती गॅस सिलिंडर महागला

datta jadhav

जुलै महिन्यात १ लाख कोटी पेक्षा जास्त जीएसटी जमा

Archana Banage