Tarun Bharat

तालिबानचा खरा चेहरा झाला उघड

महमूद गजनवीच्या कब्रवर पोहोचला तालिबानी नेता, सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याचा केला उल्लेख

वृत्तसंस्था/ गजनी

तालिबानी नेता आणि भारताचा मोठा शत्रू असलेल्या अनस हक्कानीने मंगळवारी महमूद गजनवीच्या कब्रला भेट दिली आहे. गजनवीने गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर अनेकदा हल्ले केले होते. कुख्यात हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या अन् तालिबानचा अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानीचा कनिष्ठ बंधू असलेल्या अनसने गजनवीला एक ‘प्रसिद्ध मुस्लीम योद्धा’ संबोधिले आहे.

10 व्या शतकातील एका प्रसिद्ध मुस्लीम योद्धा आणि मुजाहिद सुल्तान महमूद गजनवीच्या दर्ग्याचा दौरा केला, गजनवीने क्षेत्रात एक मजबूत मुस्लीम शासन प्रस्थापित केले आणि सोमनाथ मंदिरात तोडफोड केल्याचे अनस हक्कानीने ट्विट करत म्हटले आहे.

सोमनाथ मंदिरावर 17 वेळा आक्रमण

महमूद गजनवीने 998 ते 1030 सालापर्यंत शासन केले, महमूद  गजनवीने सोमनाथ मंदिरावर 17 वेळा आक्रमण केले होते. अखेरीस 1024 मध्ये हिंदूंच्या या पवित्र धार्मिक स्थळी लूट करण्यास तो यशस्वी ठरला होता. गजनवीने विशेषकरून हिंदू मंदिरांना लक्ष्य केले होते.

हक्कानी नेटवर्क जगभरात कुख्यात

अनस हक्कानी दोहा येथील तालिबानच्या शिष्टमंडळात सामील होता. हक्कानी नेटवर्क आणि तालिबान 1990 च्या दशकात एकत्र आले. या क्रूर दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आता तालिबानच्या सरकारमध्ये सामील आहे. जागतिक दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानी सध्या अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाचा प्रमुख आहे.

भारताविरोधात ओकली गरळ

अफगाणिस्तानचे लोक भारताला खरा मित्र मानत नसल्याचे अनसने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते. भारत पक्षपात करतो आणि मागील 20 वर्षांपासून युद्ध भडकविण्याच्या कामात सामील होतो. भारताने शांततेसाठी काहीच केलेले नाही, आतापर्यंत त्याची भूमिका नकारात्मक राहिल्याचे अनसने म्हटले होते.

दहाव्या शतकात हल्ला

हिंदूंसाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱया 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक सोमनाथ मंदिरावर 1026 मध्ये महमूद गजनवीने हल्ला केला होता. गजनवीने स्वतःच्या 5 हजार लुटारूंसोबत या मंदिरावर हल्ला करत संपत्ती लुटली होती. सोमनाथ मंदिरावर त्यापूर्वी आणि त्यानंतर देखली अनेकदा आक्रमण झाले, त्याची तोडफोड झाली, पण दरवेळी या मंदिराची पुन्हा उभारणी झाली आहे. अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशावर या मंदिराची पुनउ&भारणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

Related Stories

पाकला दणका; सौदी अरेबियाने रोखला कच्च्या तेलाचा पुरवठा

datta jadhav

ब्रिटनमध्ये लॉकडाऊनला विरोध

Patil_p

आता दुतावासावरही ‘ड्रोन’च्या घिरटय़ा

Patil_p

ॲमेझॉनचे कर्मचारी आजपासून संपावर

prashant_c

शांघायमधून रवाना होणार ‘वंडर ऑफ द सीज’

Patil_p

5 व्या जनरलच्या मृत्युमुळे भडकला रशिया

Omkar B