काबुल \ ऑनलाईन टीम
अफगाणिस्तानात ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी पहिल्या अधिकृत पत्रकार परिषदेत इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्याचे वचन दिले. कोणत्याही आंतरराष्ट्रीय दूतावास किंवा संस्थेला हानी पोहोचवणार नाही, अशी ग्वाही तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिदी यांनी दिली. त्यासोबतच तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तसंच जबीहुल्ला मुजाहिदी यांनी लोकांना सुरक्षेचे आश्वासन दिलं आहे.
काबुलमधील प्रेसिडेंशियल पॅलेसच्या आतून पत्रकार परिषदेला संबोधित करताना तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद म्हणाले की, महिलांच्या हक्कांचे संरक्षण इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत केले जातील. याआधी तालिबानने मंगळवारी देशातील सर्व लोकांना सार्वत्रिक माफी जाहीर करतानाच अभय दिले होते. महिलांनीही सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
त्यांनी वचन दिले की तालिबान अफगाणिस्तान सुरक्षित करतील. त्यांनी असेही म्हटले की ज्या लोकांनी मागील सरकारसोबत किंवा परदेशी सरकार किंवा सैन्याबरोबर काम केले त्यांच्यावर कोणताही सूड उगवायचा नाही. आम्हाला इतर देशांशी शांततापूर्ण संबंध हवे आहेत.


previous post