Tarun Bharat

तालिबान आज सत्ता स्थापन करणार

Advertisements

ऑनलाईन टीम / काबुल :

तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर दोन आठवडय़ातच सरकार स्थापनेची तयारी केली आहे. तालिबानकडून आज दुपारच्या नमाजानंतर सरकार स्थापनेची घोषणा होऊ शकते, असे एएफपी संस्थेने सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

सध्या अफगाणिस्तान मोठय़ा आर्थिक संकटात असून, हे सरकार पूर्णपणे आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून असणार आहे. अफगाणिस्तानातील दूतावास सुरू ठेवणे आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून मदतीचे आश्वासन चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. तर कतारनेही काबुल विमानतळ पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी तालिबानसोबत चर्चेला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय देणगीदार आणि गुंतवणूकदारांच्या दृष्टीने नवीन सरकारची वैधता अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

दरम्यान, तालिबान सरकारचा सुप्रीम नेता म्हणून मुल्ला हिबातुल्ला अखुंदजादा याचे नाव घोषित केलं जाण्याची शक्यता आहे.

Related Stories

लोकांचे इंग्रंजी सुधारून झाला अब्जाधीश

Patil_p

बजरंग पुनियाची उपांत्य फेरीत धडक

datta jadhav

सरकारविरोधी रॅली; मरियम नवाज यांच्याविरोधात गुन्हा

datta jadhav

लस घ्या; अन्यथा सिमकार्ड बंद!

datta jadhav

अद्याप नाही ‘समूह प्रतिकारशक्ती’

Patil_p

पॅकेजवरून राजकारण

Patil_p
error: Content is protected !!