Tarun Bharat

तालिबान विरोधात सरसावली महिला गव्हर्नर

Advertisements

तयार केले स्वतःचे सैन्य

वृत्तसंस्था / काबूल

अफगाणिस्तानात तालिबान स्वतःचा कब्जा वाढवत चालला आहे. तालिबानने आता प्रांतीय राजधान्यांच्या दिशेने कूच केली आहे. अशा स्थितीत पुरुषप्रधान अफगाणिस्तानात एक महिला जिल्हा गव्हर्नर सलीमा मजारी यांनी एक मोहीम हाती घेतली आहे. तालिबानविरोधात लढण्यासाठी सलीमा यांनी पुरुषांची भरती चालविली आहे.

मे महिन्यापासूनच तालिबानने अफगाणिस्तानच्या ग्रामीण भागांमधील स्वतःची सक्रियता वाढविली होती. अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा करतातच अफगाणिस्तानातील स्थिती बदलली आहे. दहशतवाद्यांच्या कब्जानंतर अनेक जिल्हय़ांमधील लोकांना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. पण पर्वत आणि दऱयांमधील चारकिंट जिल्हय़ात मजारी यांचे शासन आहे. बल्ख प्रांतातील हा जिल्हा मजार-ए-शरीफपासून एक तासांच्या अंतरावर आहे.

मजारी समुदाय लक्ष्य

तालिबानकडून मानवाधिकार पायळी तुडविले जातात. तालिबानने महिला आणि मुलींना शिक्षण आणि रोजगारापासून वंचित ठेवले होते. 2001 नंतर गोष्टी बदलू लागल्या होत्या. मजारी या हजारा समुदायाशी संबंधित आहेत. या समुदायातील बहुतांश जण शिया मुस्लीम आहेत. तालिबानची या समुदायावर वक्रदृष्टी आहे. हजारा समुदयाला तालिबान आणि इस्लामिक स्टेटचे दहशतवादी लक्ष्य करत असतात. सलीमा मजारी यांचा आता बहुतांश वेळ तालिबानविरोधात लढाईसाठी लोकांची भरती करण्याकरता खर्च होतो. कारण निम्म्या जिल्हय़ावर तालिबानचा कब्जा झाला आहे. शेकडो स्थानिक लोक मजारी यांच्यासोबत जोडले गेले असून यात शेतकरी आणि मजुरांचा समावेश आहे.

जमीन विकून शस्त्रास्त्रखरेदी

आमच्याकडे बंदुका नव्हता, पण लोकांनी शस्त्रास्त्रांच्या खरेदीसाठी स्वतःच्या गायी, बकऱया तसेच जमिनी देखील विकल्या आहेत. लोक कुठल्याही वेतनाशिवाय दिवसरात्र दहशतवाद्यांचा समाना करण्यासाठी सरसावले असल्याचे मजारी यांनी म्हटले आहे. मजारी यांनी जिल्हय़ाच्या सुरक्षा दलांच्या मदतीसाठी आतापर्यंत 600 स्थानिक लोकांची भरती केली आहे. 2011 पूर्वीच्या तालिबानच्या राजवटीशी निगडित अनेक कटू आठवणी अद्याप तेथील लोकांच्या स्मरणात आहेत. तालिबान सत्तेवर परतल्यास कुठल्याही स्थितीत एका महिलेचे नेतृत्व स्वीकारणार नसल्याचे मजारी ओळखून आहेत.

Related Stories

रशियाची पहिली लस सर्वसामान्यांसाठी खुली

datta jadhav

काश्मीर भारताचा अंतर्गत विषय!

Patil_p

ऊर्जेची नासाडी रोखणार ब्रिटिश उपग्रह

Patil_p

मुंग्यांचे सेवन केल्याने वाढते वय

Patil_p

हिंदूधर्मीय हे काफिर, तर ज्यू इस्लामचे शत्रू!

Patil_p

सौदी अरेबियाने पाकिस्तानला झिडकारले

Patil_p
error: Content is protected !!