Tarun Bharat

तालुका पंचायतमध्ये गांधी व पं. शास्त्री जयंती

प्रामाणिक सेवा देण्याची घेतली शपथ

प्रतिनिधी/ बेळगाव

राष्ट्रपिता महात्मा गांधी व पं. लालबहाद्दुर शास्त्री जयंती तालुका पंचायतमध्ये मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यालयासमोर असणाऱया पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांनी पुतळय़ाला पुष्पहार अर्पण केले. तसेच पं. लालबहाद्दुर शास्त्राr यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीजींचे कार्य मोलाचे आहे. अहिंसा व शांततेच्या मार्गावर चालणाऱया गांधीजींनी मोठे बदल घडवून आणले आहेत.

याचबरोबर पं. लालबहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा देत देश हित कार्य केले आहे. यामुळे त्यांच्या कार्याला व त्यांनी घालून दिलेल्या सिध्दांवर चालण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. यावेळी तालुका पंचायतीचे व्यवस्थापक चंद्रकांत चव्हाण, पिडीओ श्रीधर सरदार, वैजनाथ सनदी, अभियंते नागेश यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

प्राचार्य जे. बी. फडके यांना निरोप

Omkar B

फिलॅटली ब्युरोमुळे बेळगावचा इतिहास सर्वदूर पसरेल!

Omkar B

सराफी पेढीतील चेन पळविणाऱ्या जोडगोळीला अटक

Tousif Mujawar

बस्तवाड (हलगा) गावात वार पाळणुकीला सुरुवात

Amit Kulkarni

कच्छ कडवा पाटीदार सनातन समाजातर्फे 49 ज्येष्ठ जोडप्यांचा सत्कार

Amit Kulkarni

1 नोव्हेंबर काळय़ा दिनाची सुनावणी पुढे ढकलली

Patil_p