Tarun Bharat

तालुका पुरवठा निरीक्षक रेशन दुकानदाराच्या दारात

तरुण भारतच्या वृत्ताची दखल, मंत्री देसाई यांनी दिले कारवाईचे आदेश

प्रतिनिधी/ सातारा

पाटण तालुक्यातील कडवे खुर्द येथील रेशन दुकानदारांकडून चक्क सडका गहू रेशनवर वितरण करण्यात आल्याची धक्कादायक बाब तरुण भारतने प्रसिद्ध करताच मंत्री शंभूराज देसाई यांनी थेट जिल्हाधिकाऱयांना कारवाईचे आदेश दिले. तर जिल्हाधिकाऱयांनी थेट पाटण पुरवठा अधिकाऱयांना खडे बोल सुनावले. पाटणचे पुरवठा निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांनी मात्र रेशन दुकानदार जवळ जावून गुळमाटपणा करत त्या नागरिकांनाच तो गहू परत आणा असा अफलातून सल्ला दिल्याने अवाक झाले. संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सध्या कोरोनाच्या काळात रेशनचे धान्य महत्वाचे ठरत आहे. मात्र, पाटण तालुक्यात कडवे खुर्द येथे चक्क सडका गहू वाटप होत आहे. त्याचा प्रकार तरुण भारतने मांडताच राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्राधान्याने लक्ष घालत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱयांनी पाटण तालुका पुरवठा अधिकाऱयांना सुचना दिल्या. रेशन दुकानाच्या दारात तालुका पुरवठा निरीक्षक तपासणीला आले खरे परंतु त्यांनी तक्रारदारांनाच रेशनचे धान्य घेवून या बदलून न्या. मला तसा अहवाल पाठवायचा आहे असा ठेका लावला होता. ज्यावेळी रेशनचे सडके धान्य बदलून द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यावेळी दुकानदारांनी विरोध केला होता. डोक्यावर ओझ घेवून ते धान्य आपल्या घरी घेवून गेले होते. मात्र, कठोर कारवाई न करता पुरवठा निरीक्षक रेशन दुकानदाराची बाजू घेताना दिसत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ग्रामस्थ सध्या पेरणीच्या कामात व्यस्त असल्याने आणि डोंगर उतरुन ते धान्य घेवून यायचे म्हणजे पुन्हा त्रास अशीही खदखद व्यक्त करण्यात आली. दुकानदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचा नोंदवला जाणार जबाब

Archana Banage

मोळाचाओढा रस्त्यावरील अरुंद पुल देतोय अपघातांना निमंत्रण

Patil_p

विनयभंग प्रकरणी संजय धुमाळ यांना अटक

Patil_p

अर्जूनवीर राहुल आवारे अडकला विवाह बंधनात

Archana Banage

अभिनेत्री दीपाली सय्यद बनल्या 1000 मुलींच्या माता

Archana Banage

स्वाभिमानीने अडवला महामार्ग

Patil_p