Tarun Bharat

तालुक्मयात अजूनही 17 कोटीची घर-पाणीपट्टी शिल्लक

वसुलीसाठी प्रयत्न सुरू : 4 कोटी 50 लाखांची वसुली ; निवडणूक ताणांतून शिल्लक असल्याचे मत

प्रतिनिधी / बेळगाव

सध्या तालुक्यात घर आणि पाणीपट्टी वसूल करण्यासाठी संबंधित अधिकाऱयांनी दुर्लक्ष केल्याचेच दिसून येते. सध्या तालुक्यातील घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या टक्केवारीत वाढ झाली असून जवळपास 17 कोटींच्या घरात ही वसुली शिल्लक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. स्वच्छ भारत योजना, रोजगार हमी योजना आणि महत्त्वाचे म्हणजे आलेल्या निवडणुकीच्या ताणांतून ही वसुली शिल्लक असल्याचे मत अधिकारी व्यक्त करू लागले आहेत. कामाचा बोजा वाढला असून कर्मचाऱयांच्या कमतरतेचा फटकाही कर वसूल आणि पाणीपट्टी वसुलीवर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

2020-21 सालच्या कर आणि पाणीपट्टी वसुलीची थकबाकी अधिकच आहे. आर्थिक कचाटय़ात असलेल्या तालुका पंचायतीच्या भोंगाळ कारभारात अधिकच भर पडत आहे. यामुळे याचा फटका संबंधित ग्राम पंचायतींना सहन करावा लागला होता. घर, पाणीपट्टी वसूल करण्यासाठी विविध शक्कली लढविण्यात आल्या असून, सध्या यामध्ये काहीशी सुधारणा होत आहे. तालुक्यात सध्या 17 कोटी 13 लाख 3 हजार 500 रुपये घरपट्टी आणि पाणीपट्टी शिल्लक असून ती वसूल करण्यासाठी आता तालुका पंचायतीने ग्राम पंचायतीच्या संबंधित अधिकाऱयांना सूचना करणार असल्याचे सांगितले आहे. येत्या लवकरच ही वसूल 100 टक्के करणार असून त्यासाठी येत्या आठवडय़ाभरात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती ता. पं. चे मुख्यकार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी दिली आहे.

बेळगाव तालुक्यातील घर पट्टी सध्या 20 टक्क्यांपर्यंत केली आहे. उर्वरित 80 टक्के अद्यापही शिल्लक आहे. महिन्याकाठी या टक्केवारीत वाढच होत आहे. बेळगाव तालुक्मयात एकूण 21 कोटी 60 लाख 76 हजार 880 रुपये इतकी वसुली असते. ही शिल्लक रक्कम लवकरच वसूल करण्यात येणार असून त्यासाठी योग्य ती उपाययोजना राबविण्याचे सांगण्यात आले आहे. ही कर वसूल चालूवर्षी पूर्ण करणार असल्याचे कलादगी यांनी सांगितले.

सध्या तालुक्यात पाणीपट्टी अधिक प्रमाणात असून ही भरण्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे. तालुक्मयात 4 कोटी 47 लाख 73 हजार 480 रुपये इतकी वसुली करण्यात आली आहे. तर 17 कोटी 13 लाख 3 हजार 500 रुपये इतकी वसुली शिल्लक आहे. त्यामुळे ही वसुली करण्यासाठी आता मोठे प्रयत्न होण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. ही वसुली न झाल्याने विकासात मोठा अडथळा निर्माण होत आहे.  

ग्रामपंचायतींना सूचना करणार -मल्लिकार्जुन कलादगी

बेळगाव तालुक्मयात पाणी व घरपट्टी वसुली करण्यासाठी त्या त्या ग्राम पंचायतींना सूचना करण्यात येणार आहेत. 17 कोटींची वसुली पूर्ण करण्यासाठी आता तातडीने प्रयत्न करण्यात येतील. त्यासाठी लवकरच बैठक बोलावून संबंधितांना सूचना करण्यात येणार आहेत.

Related Stories

सप्तसूर संगीत विद्यालयातर्फे गुरुवंदना कार्यक्रम

Amit Kulkarni

लाल-पिवळा हटवा; अन्यथा प्रत्येक चौकात भगवा

Patil_p

जायंट्स सखीतर्फे दुर्गादेवी मंदिरात दीपोत्सव

Amit Kulkarni

बदलत्या जीवन शैलीमुळे वंध्यत्व

Amit Kulkarni

बेळगाव-गोवा मार्गावर जांबोटीनजीक वाहतूक ठप्प

Amit Kulkarni

हिंडलगा कारागृहात मोबाईल आढळला

Amit Kulkarni