Tarun Bharat

तालुक्यात दिवाळीला पारंपरिक पद्धतीने सुरुवात

वार्ताहर/ किणये

तालुक्मयात दिवाळी सणाला मोठय़ा उत्साहात व पारंपरिक पद्धतीने सुरुवात करण्यात आली. शनिवारी नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान तसेच गावागावांमध्ये सामूहिक आरती करण्यात आली.

कोरोनाचे संकट असले तरीही दिवाळीनिमित्त नागरिकांमध्ये दरवषीप्रमाणेच उत्साह दिसून आला. महिलांनी घरांसमोर विविध प्रकारच्या रांगोळय़ा काढल्या होत्या. शेणाच्या गवळणीही बनविण्यात आल्या होत्या.

शनिवारी व रविवारी ग्रामीण भागातील अनेक उद्योजक, व्यावसायिक यांनी आपापल्या दुकानांमध्ये, कारखान्यात लक्ष्मीपूजेचे आयोजन केले होते. सध्या ग्रामीण भागात सुगी हंगाम सुरू असल्यामुळे बहुतांश शेतकऱयांनी दिवाळीचा सण शिवारातच केला असल्याचेही निदर्शनास आले.

मागील दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. यामुळे शेतकऱयांची चिंता वाढली होती. मात्र, दिवाळी सणाला प्रारंभ झाल्यापासून ढगाळ वातावरण कमी झाले असल्याने शिवारांमध्ये भात कापणी, मळणी आदी कामांची धांदल सुरू झाली आहे.

वसुबारसनिमित्त गुरुवारीच तालुक्मयाच्या बहुतांश गावांमध्ये गाय व वासराचे पूजन करून दिवाळी सणाच्या पर्वाचा शुभारंभ करण्यात आला. सोमवारी बलिप्रतिपदा व भाऊबीज आहे. यामुळे सोमवारी शेतकरी शिवारातील पिकांची पूजा करणार आहेत. घराघरांमध्ये व सामूहिक पद्धतीने भाऊबीज करण्यात येणार आहे.

दिवाळीत बालचमूंना वेध असतात ते म्हणजे गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविण्याचे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून बालकांनी गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. या किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे उद्घाटन करण्यात आले.

विविध गावांमध्ये कबड्डी, क्रिकेट, किल्ला स्पर्धा, ट्रक्टर, स्लो-मोटारसायकल, दंड-बैठका, धावणे आदी स्पर्धांचे आयोजन केले असून सध्या या स्पर्धा गावा-गावांमध्ये रंगू लागल्या आहेत.

वन टच फोंडेशनच्यावतीने विजयनगर येथील सावली वृद्धाश्रमात दिवाळी साजरी करण्यात आली. वृद्धाश्रमाचे अध्यक्ष डॉ. जयंत पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी वन टच फौंडेशनच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर आश्रमातील वृद्धांसमवेत आनंदोत्सव साजरा करून फराळाचे वाटप केले. यावेळी सुहानी लोकम, कविता, अंकुश गावडे आदी उपस्थित होते.

Related Stories

मंजुनाथ इळगेर यांचा सत्कार

Patil_p

शेतकऱयांच्या आंदोलनाला येथील शेतकऱयांनी दिला पाठिंबा

Patil_p

स्मशानभूमीच्या जागेतच ग्राम पंचायत

Amit Kulkarni

बॉक्साईट रोडवर गांजा विकणाऱया जोडगोळीला अटक

Amit Kulkarni

‘त्या’ रस्त्याची जबाबदारी आता पंचायतराज विभागाकडे

Amit Kulkarni

शशिकला जोल्लेंना धर्मादाय, कत्तींना अन्न-नागरी पुरवठा

Patil_p