Tarun Bharat

तालुक्यात बटाटा काढणीला प्रारंभ

Advertisements

वार्ताहर /किणये

तालुक्मयात बटाटा काढणीला सुरुवात झाली आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असल्यामुळे शेतकरीवर्ग बटाटा पिकाची काढणी करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. बेळगावच्या मार्केट यार्डमध्ये 1300 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल असा दर बटाटय़ाला मिळत आहे.

बेळगाव तालुक्मयातील बेळगुंदी, संतिबस्तवाड, वाघवडे, सोनोली, यळेबैल, राकसकोप, बेळवट्टी, कुदेमनी, बाची, उचगाव, आंबेवाडी, हलगा, बस्तवाड, कोंडुसकोप याचबरोबर अगसगे परिसरात बटाटा पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. यंदा झालेल्या मुसळधार पावसात काही शेतकऱयांचे बटाटा पीक खराब झाले. यामुळे उत्पादक शेतकऱयांना फटका बसला. तर उर्वरित शिल्लक राहिलेल्या बटाटा पिकाची काढणी सुरू झाली आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून खरीप हंगामात बटाटा लागवडीचे प्रमाण कमी झाले आहे. कारण, बटाटय़ाच्या बियाणासाठी लागवड, औषध फवारणी, आंतरमगाशत व मजुरी यासाठी शेतकऱयांना वारेमाप खर्च येतो. तसेच निसर्गाचीही या पिकाला बऱयापैकी साथ हवी. जर पीक खराब झाले तर पिकाच्या उत्पादनासाठी केलेला खर्च वाया जाण्याचा धोका अधिक असल्यामुळे बरेच शेतकरी बटाटा पिकाऐवजी रताळी लागवड करण्याकडे वळू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून बेळगुंदी परिसरात बटाटा काढणीला सुरुवात झाली. तर अलीकडे अन्य भागातही याची काढणी चालू झाली आहे.

Related Stories

वृद्धांचे केशकर्तन करून जपली सामाजिक बांधिलकी

Amit Kulkarni

रहदारी पोलिसांची भाजी विक्रेत्यांवर कारवाई

Patil_p

कर्नाटक: कोरोना मृत्यू कमी करण्यावर लक्ष

Abhijeet Shinde

गुढी पाडव्यानिमित्त खळय़ाच्या कुस्त्या उत्साहात

Amit Kulkarni

हलगा येथे तीन विद्युतखांब कोसळले

Amit Kulkarni

एनएफसीआय हॉटेल मॅनेजमेंटचा विक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!