दुर्गामातेचा अखंड जयघोष, गावागावातून विभागवार मान्यवरांची व्याख्याने : आकर्षक रांगोळय़ा, कमानी, पताका, फटाक्यांची आतषबाजी, ढोल, ताशा सर्वांचे आकर्षण
वार्ताहर /उचगाव
चैतन्यमय वातावरणात उचगाव परिसरात सांगता


दुर्गामाता दौड आणि नवरात्रोत्सवात संपूर्ण तालुका शिवमय झाला होता. ज्या गावात दौड नव्हती त्या गावातूनही यंदा दौड सुरू करण्यात आली. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. दुर्गामातेचा अखंड जयघोष, गावागावातून विभागवार मान्यवरांची व्याख्याने अशा चैतन्यमय वातावरणात बुधवारी उचगाव परिसरात दौडची सांगता झाली.
छ. शिवाजी महाराज व दुर्गामातेच्या जयघोषाने सर्व गावे दणाणून गेली होती. पांढरी वस्त्रे, भगवे फेटे, गांधी टोपी, युवतीनी पांढऱया व रंगीबेरंगी साडय़ा परिधान करून मोठय़ा संख्येने दौडीत भाग घेतला होता.
प्रत्येक गावातील गल्लोगल्ली दौडीच्या मार्गावर रेखाटण्यात आलेल्या आकर्षक रांगोळय़ा, उभारलेल्या कमानी, भगवे ध्वज, भगव्या पताका, भगवे फेटे यांनी तयार करून बांधलेली तोरणे, नारळाच्या झावळय़ा, केळीचे मोने, फटाक्मयांची आतषबाजी, ढोल, ताशा यामुळे सर्व परिसर चैतन्यदायी बनला होता. उचगावात दरवषी शेवटच्या दिवशी दसऱयाचे औचित्य साधून पालखी मिरवणूक काढून दौडची सांगता होण्याची परंपरा आहे. प्रत्येक घरासमोर सुवासिनीने औक्षण करून पूजन केले. सकाळी सहा वाजता गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातून, मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी उचगाव प्रमुख नेहाल जाधव, उचगाव विभाग प्रमुख मिथिल जाधव यासह शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे सर्व कार्यकर्ते, गावातील युवक, युवती व नागरिक मोठय़ा संख्येने पालखी सोहळय़ात सहभागी झाले होते.
गणपत गल्ली, मळेकरणी देवस्थान, चव्हाट गल्ली, आंबेडकर नगर, सुरवीर गल्ली, अनगोळ गल्ली, नागेशनगर, मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली, रवळनाथ गल्ली, कचेरी गल्ली आदी मुख्य मार्गावरून ही मिरवणूक काढली. यावषी प्रत्येक गल्लीमध्ये शिवरायांच्या आकर्षक मूर्ती उभारून पूजन केले.
रवळनाथ देवस्थानची मानाची पालखी मिरवणूक


रवळनाथ देवस्थानची मानाची पालखी मिरवणूक व शेकडो युवकांच्या मराठमोळय़ा वेशभूषेत झालेल्या दुर्गादौडीने उत्साही वातावरणात कुदेमनी गावात यंदाच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली. गावातील गावडेवर रवळनाथ मंदिर, लक्ष्मी मंदिर, हनुमान मंदिर, अंबाबाई मठ, श्री गणेश मंदिर व नाईकवाडय़ावरील दुर्गादेवी मंडपात घटस्थापना करून परंपरा जोपासली. गावातील युवक मोठय़ा संख्येने दौडीत सहभागी झाले होते. वारकरी सांप्रदाय मंडळींनी मंदिरांमध्ये नित्य भजनी गजर केला.
बुधवारी प्रत्येक गल्लीत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजण्यात आल्या होत्या. भगव्या पताका लावून गावात स्वच्छता करण्यात आली होती. गल्लोगल्ली रांगोळय़ांचे सडे घातले होते. गावातील लक्ष्मी मंदिर तसेच नाईकवाडय़ावरील दुर्गादेवी मंडळाच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते. रवळनाथ देवस्थानाची मानाची पालखी मंगळवारी परंपरेनुसार लक्ष्मी मंदिरात दाखल झाली. गाऱहाणे, मानपान, पानविडे, आरती आदी परंपरागत धार्मिक विधी झाला. नगाऱयाच्या गजर व हर हर महादेवच्या जयघोषात पालखी मिरवणुकीने दसरोत्सवाची सांगता झाली.
अलतगा येथे दुर्गामाता दौडची सांगता


अलतगा येथे नऊ दिवस सुरू असलेल्या दुर्गामाता दौडची विजयादशमीला उत्साहात सांगता केली. शेवटच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचे पूजन सुमित चौगुले यांनी केले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे नामदेव पिसे यांनी उपस्थित धारकऱयांना शिवरायांच्या पराक्रमी आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला. दौड यशस्वी करण्यासाठी भरमा कंग्राळकर, मनोहर भातकांडे, सुनील चौगुले, किरण चौगुले, नितीन भातकांडे व इतरानी परिश्रम घेतले.
धामणे पद्मावती देवी पालखी सोहळय़ाची सांगता


येथील जैन समाजातर्फे नवरात्रोत्सवाच्या दहाव्या दिवशी सकाळी पद्मावती देवीच्या पूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी पद्मावती देवीच्या पालखी सोहळय़ाची सवाद्य मिरवणूक बस्तीपासून काढली. गावभर फिरून पुन्हा बस्ती आवारात येऊन मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणुकीत गावातील जैन बांधव, भगिनी, युवक-युवती सहभागी झाले होते. रात्री देवीचे पूजन झाल्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
तारिहाळ येथे भक्तिमय वातावरण


तारिहाळ येथे भक्तिभय वातावरणात दौडची सांगता झाली. बुधवारी सकाळी 6 वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे व ध्वजाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केले. दौडप्रसंगी प्रत्येक गल्ली रांगोळय़ांनी सजविली होती. दौडमध्ये युवक-युवती सहभागी झाले होते. जगदीश्वर मंदिरात ध्येयमंत्र झाल्यानंतर श्री आडवी सिद्धेश्वर मठाचे उत्तराधिकारी श्री आढळेश्वर मरीस्वामी यांच्या हस्ते ध्वज उतरवून दौडची सांगता झाली.