Tarun Bharat

तालुक्यात विकेंड कर्फ्यू जारी

वार्ताहर/ किणये

तालुक्मयात गेल्या आठवडय़ापासून विकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, व्यापारीवर्गातून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका प्रशासनाने वर्तविला असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून व कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शनिवार व रविवार असे दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

शनिवारी दुपारनंतर तालुक्मयातील पिरनवाडी, हिंडलगा, कंग्राळी, कडोली, सांबरा, कणबर्गी, हलगा-बस्तवाड, येळ्ळूर आदी परिसरातील मुख्य रस्त्यांच्या बाजूला असलेली दुकाने बंद ठेवण्यात आली होती. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळच्या सत्रात सुरू होती. काही मुख्य रस्त्यांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विनाकारण ये-जा करणाऱयांची पोलीस कसून चौकशी करीत होते.

कामगारवर्ग व अत्यावश्यक कामासाठी जाणाऱयांकडे ओळखपत्राची विचारणा केली जात होती. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे, दुसरीकडे पुन्हा विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आला असल्यामुळे व्यापारीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामीण भागात अजूनही नागरिक कोरोनाच्या लसीसाठी धावपळ करताना दिसत आहेत. सर्व नागरिकांना कोरोनाचे दोन्ही डोस देण्यावर प्रशासनाने व आरोग्य खात्याने भर दिला पाहिजे, असेही व्यापारीवर्गाचे म्हणणे आहे. काही जण नाराज असले तरी सर्वसामान्य जनता मात्र प्रशासनाच्या नियमावलीचे पालन करून विकेंड कर्फ्यूला प्रतिसाद देत असल्याचे दिसून येत आहे. 

Related Stories

डॉल्बीचा आवाज-वेळेवर नियंत्रण हवे

Omkar B

अर्धवट कामे मार्चपर्यंत तातडीने पूर्ण करा

Omkar B

वक्फ बोर्ड कायदा रद्द करा!

Amit Kulkarni

अस्तुली पुलानजीक ट्रक कलंडला

Omkar B

परसात गांजा पिकविणाऱया दोघा जणांना अटक

Amit Kulkarni

पोटनिवडणुकीसाठी आम्ही सज्ज

Amit Kulkarni