कोरोना संसर्गामुळे मोजक्याच कार्यकर्त्यांची उपस्थिती


वार्ताहर / किणये
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा रविवारी तालुक्मयात साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोना असल्यामुळे प्रशासनाच्या नियमांचे पालन करून बहुतांशी गावांमध्ये घरोघरीही हा सोहळा साजरा करण्यात आला. काही गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर मोजक्मयाच कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून हा सोहळा साजरा केला.
दरवषी तालुक्मयाच्या अनेक गावांमध्ये मोठय़ा उत्साहात शिवरायांचा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे शिवभक्तांनी या सोहळय़ाला गर्दी न करता मोजक्याच सदस्यांसमवेत शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. तालुक्मयाच्या सर्रास गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारुढ व सिंहासनारुढ पुतळे आहेत. रविवारी सकाळी अभिषेक व विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. त्यानंतर ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हणून आरती करण्यात आली.
बेळगुंदी येथील संघर्ष ढोलताशा व संघर्ष सोशल फाऊंडेशनच्यावतीने मोजक्मयाच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. गावच्या वेशीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी शिवरायांच्या मूर्तीची पूजा केली. यावेळी तरुणीही आरती घेऊन सामील झाल्या होत्या. सर्व कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर ठेवून व मास्कचा वापर केला होता.
यावेळी महेश पाटील, कविता सुतार, स्नेहल नाकाडी, अनुराधा जाधव, नाथा आमरोळकर, रामकृष्ण पाटील, प्रदीप गावडा, मनोज शहापूरकर, राजेश निर्मळकर, शुभम नाकाडी, स्नेहल जाधव, रिया मुगुटकर, कादंबरी बेटगेरीकर आदी उपस्थित होते.


कंग्राळी खुर्द
कंग्राळी खुर्द : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानतर्फे शिवमूर्तीला दुग्धाभिषेक, जलाभिषेक करून पूजन करण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आर. आय. पाटील, सागर पाटील यांनी शिवमूर्तीला पूष्पहार घालून पूजन केले. ध्येयंमत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शिवरायांची आरती, गणेशाची आरती, प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी माजी ग्रा. पं. सदस्य सचिन शिवनगेकर यांनी शिवरायांच्या सुवर्णसिंहासनासाठी 5005 रुपयांचा धनादेश, जाफरवाडी गावचे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते लक्ष्मण सामजी पाटील 2101 रु. कंग्राळी खुर्द सुरज नागेंद्र पाटील यांनी 1111 रु. रोख स्वरुपात दिले. त्यांचे शिवप्रतिष्ठानतर्फे आभार मानण्यात आले.
शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून कोरोनाच्या महामारीत सुद्धा आपला जीव धोक्यात घालून कोरोना मृत्यूसह अनेकांचे बेळगाव येथील शासकीय दवाखान्यात शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करणारा कंग्राळी खुर्दचा युवक दीपक बंडू बसरीकट्टी या युवकांचा शिवप्रतिष्ठानतर्फे कार्याध्यक्ष आर. आय. पाटील यांच्याहस्ते भगवा फेटा, शाल व श्रीफळ देऊन त्याला गौरविण्यात आले.
यावेळी शिवप्रतिष्ठानचे मनोहर पाटील, महादेव दिंडे, परशराम मेंडके, गजानन पाटील, शिक्षक पी. बी. मास्तीहोळी, विनायक पाटील, जोतिबा पाटील, सचिन शिवनगेकर, सुरेश बागेवाडी, राजू बाळेकुंद्री, बाळू पावशे, पंडित पाटील, सागर गायकवाड, सागर पाटील यांच्यासह शिवप्रेमी नागरिक उपस्थित
होते.
दीड वर्षाच्या चिमुकलीचा शिवरायांना मानाचा मुजरा मच्छे येथील ऋत्वी जैनोजी या बालिकेची व्हीडिओ व्हायरल
किणये : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की, एक वेगळीच स्फूर्ती मिळते. उत्साह निर्माण होतो. अंगात वीरश्री संचारते. शिवरायांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे. त्यांची फोटो प्रतिमा जरी पाहिली की सारे जण नतमस्तक होतात. मच्छे गावातील दीड वर्षाच्या चिमुकलीने शिवरायांना मानाचा मुजरा केला आहे. या चिमुकलीचा व्हीडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून आमच्या रक्तात शिवराय भिनलेले आहेत, याचे दर्शन या चिमुकलीच्या माध्यमातून दिसून येत आहे.
मच्छे येथे गजानन जैनोजी यांच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळय़ाची मोठी फोटो प्रतिमा लावण्यात आली आहे. या फोटो प्रतिमेजवळ दीड वर्षाची ऋत्वी जाऊन बसते. त्यावेळी तिचे वडील गजानन हे तिला ‘ऋत्वी या फोटो प्रतिमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत? हे दाखव’ म्हटल्यानंतर ती चिमुकली अगदी सहजपणे शिवरायांना स्पर्श करते. त्यानंतर महाराजांना नमस्कार कर म्हटल्यावर हात जोडून, डोके टेकत नमस्कार करते. जिजाऊंनी बालवयातच शिवरायांना धडे दिले होते. त्याचप्रमाणे सध्याच्या पिढीने आपल्या घरातील बालकांना अगदी लहान वयापासूनच चांगल्या सुसंस्काराचे धडे देण्याची गरज आहे. दीड वर्षाच्या ऋत्वीने शिवरायांना मानाचा मुजरा करून प्रत्येक शिवभक्तामध्ये देशप्रेमाबद्दल उत्साह निर्माण केला आहे.