Tarun Bharat

ताल सुरांच्या धारांनी रसिक झाले चिंबचिंब

Advertisements

80 वा आँनलाईन औंध संगीत महोत्सवास उत्साहात सुरवात : ऑनलाईन प्रक्षेपण सकाळी 10 वा सुरू झाले.

वार्ताहर / औंध

ढगाळ हवामान असले तरी आणि सकाळच्या प्रसन्न वातावरणात मंद वाहणाया खटय़ाळ वायामुळे हवेत गारवा जाणवत होता. मात्र शास्त्राrय संगीताच्या मधाळ उबदार स्वरांनी वातावरण बदलून टाकले. ताल सुरांनी अवघे विश्व व्यापल्याने आँनलाईन सप्तसुरांच्या धारांनी रसिक चिंबचिंब झाले.

 कोरोनामुळे अश्विन वद्य पंचमीला यंदा संगीत महोत्सवाचे आयोजन न करता आँनलाईन पध्दतीने आज घेण्यात आला. त्याकरिता शिवानंदच्या फेसबुकपेज आणि युटय़ुबवरुन कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले होते.  कार्यक्रम आँनलाईन असला तरी रसिक श्रोत्यांनी त्याला भरभरून दाद देत शास्त्राrय संगीताचा आनंद लुटला

 सकाळी दहा वाजता बैठकीला सुरवात झाली.

उत्सवातील पहिल्या सत्राचा यज्ञेश रायकर युवा कलाकाराने ताबा घेतला. त्यांनी गानसरस्वती किशोरी आमोनकर यांच्याकडून संगीताचे धडे घेतले आहेत.  व्हायोलिन वर ललत पंचम या रागाने सुरवात केली. त्यामध्ये उडत बूंदन आणि छेलना रंग डाल या दोन बंदिशींचे दमदारपणे सादरीकरण केले.त्यानंतर स्वरचित एकताल मधील एक गत पेश केली. ताल सुरांची उधळण सुरू झाल्यामुळे श्रोत्यांच्यात उत्साह संचारला. शेवटी मिश्र खमाज मधील धून वाजवून आपले वादन त्यांनी संपवले.त्यांना तबल्यावर विश्वनाथ शिरोडकर यांनी साथ केली.

त्यानंतर पंडित अरविंद मुळगांवकर यांचे ज्येष्ठ शिष्य तालशिरोमणी किताबाचे मानकरी आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार विश्वनाथ जोशी यांचे एकल तबला वादन पेश झाले. तबल्यावर सफाईदारपणे फिरणाया बोटावर त्यांनी स्वरांना बोलते केले. ताल तबलावादनात त्यांनी ताल तीनताल सादर केला.त्यांना लेहरा साथ सिद्धेश बीचोलकर यांनी केली.

 बाराच्या सुमाराला तापमान वाढत चालले असले तरी बरसणाया सप्तसुरांमुळे हवेत संगीताची शितल छाया पसरली होती. 

सकाळच्या सत्राची सांगता ललित कला केंद्र,पुणे येथे गुरू म्हणून कार्यरत असलेले विश्वेश सरदेशपांडे यांच्या गायनाने झाली. ग्वाल्हेर घराण्याचे गायक केदार बोडस यांचेकडे गायकिचे धडे घेत आहेत. त्यांनी 

राग जौनपुरी मध्ये मध्यलय झपतालात गुनीजन सब मिल व त्याला जोडून द्रुत तीनताल मध्ये गुरु की सेवा जो करे या बंदिशी सादर केल्या व आपल्या गायनाची सांगता राग गौड़सारंग रागातील मध्यलय तीनताल मधील पारंपरिक परो नहीं मोरे पैयां बंदिशीने केली.

त्यांना तबल्यावर पुष्कर महाजन व हार्मोनियम  सौमित्र क्षीरसागर यांनी साथ केली.

नव्या पिढीने आँनलाईन जबाबदारी पेलली.

  दरवर्षी शिवानंद प्रतिष्ठानच्या वतीने संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे कार्यक्रम घेण्यावर निर्बंध होते. त्यामुळे शास्त्राrय संगीताची मैफील रंगणार नसल्याने रसिकश्रोते हिरमुसले होते. शास्त्राrय संगीताचा दैदिप्यमान वारसा जपणाया जोशी घराण्यातील नव्या पिढीचे नेतृत्व करणाया पल्लवी जोशी, अपूर्वा गोखले यांनी विश्वस्तांना बरोबर घेऊन 80 वर्षाची परंपरा कायम ठेवण्यासाठी आँनलाईन संगीत महोत्सव घेण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन ती यशस्वी करून दाखवली आहे.

Related Stories

साताऱ्यात पॉझिटीव्हीटी वाढीचा घोळ, हा घ्या पुरावा

datta jadhav

महाराष्ट्र पोलीस दलावर अविश्वास चुकीचा

Patil_p

कविता म्हेत्रे यांच्या कवितासंग्रहाला मसापचा पुरस्कार

Patil_p

मायक्रो कंटेन्मेंट झोनच्या स्टिकरला विलंब

Patil_p

सातारा गोळीबार प्रकरण : पुण्यातून तिघे अल्पवयीन संशियित ताब्यात

Kalyani Amanagi

पहिली महिला कोरोना मुक्त झालेल्याला उलटले वर्ष

Amit Kulkarni
error: Content is protected !!