Tarun Bharat

ताळगाव श्री सातेरी देवीचा 8 पासून वर्धापन सोहळा

वार्ताहर/ पणजी

आमाराल बांध ताळगाव येथील श्री सातेरी देवस्थानच्या मूर्ती प्रतिष्ठपनेचा 29 वा वर्धापानदिन सोहळा शनिवार दि. 8 ते बुधवार दि. 12 फेब्रुवारीपर्यत विविध धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांसह भरगच्च कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

 शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून विधींना प्रारंभ होईल. त्यामध्ये महाभिषेक, अलंकारविधी, श्रीगणेशपूजन, पुण्याहवाचन, कलशस्थापना, नवचंडी पारायण व हवन होईल. सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत सुवासिनींकडून श्रींस कुंकुमार्चंन आणि त्यानंतर पुर्णाहुती, महाआरती व तीर्थप्रसाद होईल. संध्याकाळी 7 वाजता श्रींची पालखीतून बँडवादनासह गावात मिरवणूक होईल. यावेळी देवस्थानात भजन होईल. पालखीचे परत देवस्थानात आगमन झाल्यानंतर आरती व तीर्थप्रसाद होईल.

 रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून श्रीस अभिषेक व अन्य विधी त्यानंतर दु. 12 वा. आरती व तीर्थप्रसाद, संध्या. 7.30 वा. श्रींची पालखीतून मंदिराभोवती मिरवणूक, रात्री 8.30 वा. स्वर संध्या हा अभंग, नाटय़-भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे.

 सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून अभिषेक, दुपारी 12 वा. आरती व तिर्थप्रसाद, 7.30 श्रींची पालखी मिरवणूक, 8.30 वाजता पुणे येथील कलाकारांचा ‘ठेवी जपुनी जीवा’ हा अभंग व नाटय़गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 मंगळवारी 6 वाजल्यापासून अभिषेक, दु. 12 वा. आरती, तीर्थप्रसाद, सध्यांकाळी 7.30 वा. श्रींची पालखी मिरवणूक, रात्री 8.30 वा. सांस्कृतिक कार्यक्रम होईल.  बुधवारी रात्री 8.30 वा. बाळकृष्ण दशावतारी नाटय़ मंडळ मालवण यांचा दशावतारी नाटय़प्रयोग सादर करण्यात येईल.

Related Stories

शिवाजीराजे हायस्कूलचा शंभर टक्के निकाल

Amit Kulkarni

कोविड निगा केंद्राला विरोध राजकीय प्रेरणेनेच !

Omkar B

‘कालचा दिवस बरा होता’ म्हणण्याची वेळ

Amit Kulkarni

लेखी आश्वासनाशिवाय शेळ मेळावली आंदोलन मागे घेणार नाही

Amit Kulkarni

सांगेतील सरकारी जमिनीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई

Patil_p

राज्य निवडणूक आयुक्त सरकारचे बाहुले

Amit Kulkarni