Tarun Bharat

तावडेंना दिल्लीतील शाळा दाखवा आणि परत पाठवा : केजरीवाल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जोर लावला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांसह केंद्रीय मंत्री आणि अनेक नेते दिल्लीमध्ये मुक्कामी आहेत. तर महाराष्ट्रामधूनही काही नेते दिल्लीला गेले आहेत.

माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे सुद्धा दिल्लीमध्ये उमेदवारांचा प्रचारासाठी जाणार आहेत. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे.

केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलेय, विनोद तावडे महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी महाराष्ट्रात 1300 सरकारी शाळा बंद केल्या आहेत. ते आता दिल्लीत भाजपचा प्रचार करण्यासाठी येत आहेत. माझ्या दिल्लीवासीयांनो, तुम्ही खूप मेहनत करून सरकारी शाळा चांगल्या बनवल्या आहेत. ते आले की त्यांना आपल्या शाळा दाखवा, छोले भटूरे खाऊ घाला आणि दिल्लीचे दर्शन करून परत पाठवून द्या. ते आपले पाहूणे आहेत, अशा शब्दात केजरीवाल यांनी विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे.

 

Related Stories

मंगळाच्या दिशेने चीनचे पडले पाऊल

Patil_p

भारताने विमानोड्डाणे पुन्हा सुरू करावीत!

Patil_p

मिशन 100% ‘विद्युतीकरण’..!

Rohit Salunke

कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

ट्विटर केंद्र सरकारला आव्हान देण्याच्या तयारीत

Patil_p

पासवान यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Patil_p
error: Content is protected !!