प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरातील कासार गल्ली, येथील एका 71 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने आज पहाटे मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत कोरोनाने बळींची संख्या 15 झाली आहे. तर तासगाव तालुक्यात बळी गेलेल्यांची एकूण संख्या 20 झाली आहे. मंगळवारी तासगाव तालुक्यात एकूण 17 रूग्ण सापडले आहेत. त्यामध्ये तासगाव-3, कवठेएकंद-4,डोंगरसोनी-3,वासुंबे-3,व बोरगांव, लोकरेवाडी,पुणदी,मणेराजुरी, येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 249 रूग्ण सापडले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सुर्यवंशी यांनी दिली आहे.
तासगावात कोरोना बाधित रूग्णांच्या तुलनेत बळी जाणाऱ्यांचे प्रमाण अवाक् करणारे असून प्रशासनाने आता त्यासाठी एक पाऊल पुढे टाकून काम करणे आवश्यक आहे.


previous post
next post