तासगाव / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरच आहे. तासगाव शहरात आज एकाच दिवशी सर्वाधिक 16 रूग्ण सापडले. आतापर्यंत नगरपरिषदेतील एकूण सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज काही वेळ नगरपरिषद परिसरात कंटनमेंट झोन करण्यात आले होते. तर तालुक्यातील वायफळे-2,आरवडे-4,डोंगरसोनी-2,सावळज-3,. मांजर्डे-4,हातनोली-2,नेहरूनगर-4,शिरगांव क-2,तसेच विसापूर, चिंचणी, तुरची येथे प्रत्येकी एक असे एकूण 42 रूग्ण सापडले आहेत. तर तालुक्यात 123 दिवसात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1158 झाली आहे.


previous post