तासगाव/ प्रतिनिधी
तासगाव तालुक्यात गुरूवारी केवळ एका गावात एकच रूग्ण सापडला आहे.तर शहरात पुन्हा शुन्य रूग्ण असे दिलासा दायक चित्र पाहवयास मिळाले आहे.
तालुक्यात आत्तापर्यंत 207 दिवसात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 3250 झाली आहे. गुरुवारी तालुक्यातील वज्रचौंडे या एकाच गावात केवळ एक रूग्ण सापडला आहे. अन्यथा तालुक्यातील 68 गावात शुन्य रूग्ण असे दिलासा दायक चित्र पाहवयास मिळाले आहे.
तालुक्यात गुरूवारी एकाही रूग्णांचा मृत्यू झालेला नाही. तर तालुक्यात यापूर्वी पेक्षा कमी रूग्ण संख्या व मृत्यू चे प्रमाण ही कमी यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.