प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरातील विटा नाका, पाणी टाकी नजीक तासगावातील एका तरुणाचा भोसकून खून करण्यात आला. आज खून करून अज्ञात हल्लेखोरांनी घटनास्थळावरून धूम ठोकली. या घटनेने विटा नाका परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली.
गेल्या काही महिन्यांपासून दोन गटात वाद सुरू होता. यातून त्यांच्यामध्ये वादाचे प्रकार घडले होते. तसेच त्यानंतर परस्पर विरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले होते.


previous post