Tarun Bharat

ता. पं.मधील सकिंग मशिन ‘असून अडचण नसून खोळंबा’

मागील दोन वर्षांपासून मशिन वापराविना, ट्रक्टर उपलब्ध झाल्यास प्रश्न निकालात काढणार

प्रतिनिधी /बेळगाव

विविध उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातही शौचालयांची देखभाल व्हावी या उद्देशाने प्रत्येक तालुक्मयाला सकींग मशिन उपलब्ध करून देण्याचा आदेश राज्य सरकारने 2011-12 मध्ये दिला होता. मात्र या आदेशाची अंमलबजावणी तब्बल आठ वर्षानंतर झाली आहे. मात्र मागील दोन ते तीन वर्षांपासून ही मशिन तालुका पंचायतसमोर पडून आहे. याचा उपयोग जनतेसाठी यावषी तरी करण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे याकडे अधिकाऱयांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. सध्या ही सकिंग मशिन असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

तालुका पंचायतला सकिंग मशिन मिळाली असली तरी ती त्यासाठी लागणारा ट्रक्टर नसल्याने वापराविना पडून आहे. भाडेतत्त्वावर अथवा नवीन ट्रक्टर खरेदी करून हा प्रश्न निकालात काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. जिह्यातील प्रत्येक तालुका पंचायतला एक सकिंग मशिन देण्यात आली आहे.

अवघ्या काही दिवसांतच बेळगाव जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी अधिकाऱयांचे प्रयत्न झाले. काही वर्षांनंतर सकींग मशिन पाठवण्याची सुबुद्धी प्रशासनाला सुचल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र दोन ते तीन वर्षांनंतर एकदाही या मशिनचा वापर करण्यात आला नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने प्रत्येक तालुक्मयाला एक सकिंग मशिन देण्याचा आदेश दिला. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. जिल्ह्य़ातील अजूनही तीन तालुके वगळता इतर तालुक्मयांना सकींग मशिन देण्यात आली. मात्र अधिकाधिक तालुक्मयांमध्ये या मशिनचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे.

अधिकाऱयाच्या बदलीने काम थांबले

तालुका पंचायतचे तत्कालीन कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी या मशिनसाठी प्रयत्न केले होते. ही मशिन नागरिकांसाठी उपलब्ध व्हावी यासाठी ट्रक्टरचीही व्यवस्था करणार होते. मात्र त्यांची बदली झाल्याने हे काम थांबले. त्यामुळे ही मशिन म्हणजे ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. तालुका पंचायतसमोरील जागेत सध्या सकिंग मशिन उभी करण्यात आली आहे. तब्बल दोन वर्षे लोटली तरी याबाबत गांभीर्य घेण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे.

सरकारने अनुदान दिले तर सोय करणार

तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱयांकडे विचारणा केली असता सध्या तरी भाडेतत्त्वावर ट्रक्टर घेण्यात येईल. त्यानंतर सरकारने अनुदान दिले तर तालुका पंचायत स्वखर्चाने ट्रक्टर घेऊन तो नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करणार असल्याचे कार्यकारी अधिकारी-राजेश दनवाडकर यांनी सांगितले. तालुका पंचायतच्यावतीने नवीन ट्रक्टर घेण्यासाठीही हालचाली सुरू असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

रेशनच्या वितरणात प्लास्टिकसदृश तांदूळ

Amit Kulkarni

वाळू तस्करी विरोधात तक्रार केली म्हणून पोलिसांकडून तरुणाला मारहाण

Tousif Mujawar

सदाशिवनगरमधील ‘त्या’ अतिक्रमणावर कारवाई

Amit Kulkarni

साक्षरता भारत कलिका केंद्राचे उद्घाटन

Rohit Salunke

जुनेबेळगाव स्मशानभूमीतील समस्यांकडे मनपाचे दुर्लक्ष

Amit Kulkarni

जिल्हय़ात 1824 श्वानांना रेबीज लस

Amit Kulkarni