Tarun Bharat

ता.पं.मधील सकिंग मशीनचा वापर कधी होणार?

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव तालुक्मयाचा विस्तार वाढत चालला आहे, तशा तेथील समस्याही आ-वासून उभ्या आहेत. महानगरपालिका ज्या प्रमाणे शौचालय अथवा स्वच्छतागृहांचा मैला काढण्यासाठी सकिंग मशीन उपयोगात आणते तशीच मशीन तालुक्मयातही उपयोगात आणावी यासाठी प्रयत्न झाले. तालुक्मयाला सकिंग मशीन मिळाली. मात्र ती वापराविना पडून असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

विविध उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातही शौचालयांची देखभाल व्हावी या उद्देशाने प्रत्येक तालुक्मयाला सकिंग मशीन उपलब्ध करून देण्याचा आदेश राज्य सरकारने 2011-12 मध्ये दिला होता. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी तब्बल सहा वर्षांनंतर झाली आहे. दरम्यान, तालुका पंचायतला सकिंग मशीन मिळाली असली तरी ती आता वापराविना पडून आहे. ट्रक्टरची समस्या नसल्याने मशीनचा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, त्यासाठी भाडेतत्त्वावर अथवा नवीन ट्रक्टर खरेदी करून हा प्रश्न निकालात काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

तालुक्मयाबरोबरच जिह्यातील प्रत्येक तालुका पंचायतला एक सकिंग मशीन देण्यात आली. बेळगाव तालुका शौचालयमुक्तही झाला. सहा वर्षांनंतर सकिंग मशीन पाठवण्याची सुबुद्धी प्रशासनाला सुचल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. मात्र, चार-पाच वर्षे झाली पण एकदाही या मशीनचा वापर करण्यात आला नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

2011-12 साली राज्य सरकारने प्रत्येक तालुक्मयाला एक सकिंग मशीन देण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे मशीनही मिळाल्या. मात्र, या मशिन्स वापराविना पडून आहेत. बेळगाव तालुक्मयातच अशी समस्या आहे असे नाही तर इतर तालुक्मयांमध्येही सकिंग मशीन पडून असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हय़ातील तीन तालुक्मयांना ही सकिंग मशीन अजूनही देण्यात आली नाही. दरम्यान, बेळगाव तालुक्मयात सध्या 100 टक्के शौचालय निर्मितीचे काम पूर्ण झाल्याची नोंद आहे. मात्र, अजूनही ज्यांना शौचालयाची गरज असल्यास त्यांनी ती बांधून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ही सकिंग मशीन वाहून नेण्यासाठी ट्रक्टरची गरज असते. मोठा खटाटोप करून राज्य सरकारकडून मशीन पाठविली तरी ती घेऊन जाण्यासाठी ट्रक्टरच नसल्याने आता पुन्हा असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. तालुका पंचायतसमोरील जागेत सध्या सकिंग मशीन उभे करण्यात आली आहे. तब्बल चार -पाच वर्षे लोटली तरी याबाबत गांभीर्य घेण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. 

Related Stories

वृत्तपत्र विपेता संघाच्यावतीने डॉ.कलाम जयंती साजरी

Patil_p

भू सुधारणा कायदा रद्द करा

Amit Kulkarni

पर्यावरण साहाय्यक अभियंत्यांची चारही पदे रिक्त

Amit Kulkarni

पोलीस आयुक्त कार्यालयाचा कोनशिला आठवडय़ाभरात

Patil_p

तालुक्यात भात रोप लागवड अंतिम टप्प्यात

Patil_p

हिरेकोडीतील लाभार्थींना घरकुल मंजुरीपत्रे द्या

Omkar B