Tarun Bharat

तिगडी येथील तरुणाचा खून

Advertisements

धारदार हत्याराने हल्ला करून केला खून

प्रतिनिधी /बेळगाव

तिगडी, ता. बैलहोंगल येथील एका तरुणाचा भीषण खून करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली असून बैलहोंगल पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

बसवराज रामाप्पा नायकर (वय 26) रा. तिगडी असे त्या तरुणाचे नाव आहे. आपल्या मोटारसायकलवरून शनिवारी रात्री तो काम संपवून घरी जात होता. त्यावेळी तिगडीजवळ त्याला वाटेतच अडवून त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला करण्यात आला आहे. रात्री 10 ते 11 या वेळेत ही घटना घडली आहे.

खुनाचा प्रकार उघडकीस येताच अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक शिवानंद कटगी आदी अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. बसवराजच्या डोक्मयावर सपासप वार करण्यात आले आहेत. रस्त्यावर रक्ताच्या थारोळय़ात त्याचा मृतदेह पडला होता. पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे.

यासंबंधी बैलहोंगल पोलिसांशी संपर्क साधला असता बसवराजचा खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा झाला नाही. तो हिरेबागेवाडी येथील एका टाईल्सच्या दुकानात कामाला जात होता. रात्री दुकान बंद करून मोटारसायकलवरून घरी परतताना त्याचा खून करण्यात आला आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Stories

पंधराव्या वित्त आयोग अनुदानांतर्गत मनपाला 22 कोटीचा निधी मंजूर

Patil_p

आनंदनगरमध्ये स्वखर्चाने सॅनिटायझरची फवारणी

Amit Kulkarni

शहापूर येथील हेस्कॉमचे कार्यालय हलविले

Patil_p

बागलकोट जिल्हय़ात 76.67 टक्के मतदान

Patil_p

बिजगर्णी येथे ऊस पिकाला आग

Amit Kulkarni

गर्लगुंजी गावच्या बाळासाहेब पाटील यांचा वाढता पाठिंबा

Patil_p
error: Content is protected !!