Tarun Bharat

तिरंग्याचा अवमान झाल्यास कठोर कारवाई

प्रतिनिधी/ बेळगाव

26 जानेवारी प्रजासत्ताकदिन दरवषीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा क्रीडांगणावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. ध्वजारोहण पालकमंत्री जगदीश शेट्टर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याची तयारी आतापासून करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली. याचबरोबर बऱयाचवेळा तिरंग्याचा अवमान होण्याच्या घटना घडत आहेत. जर बेजबाबदारपणे कोणीही तिरंग्याचा अवमान केला तर संबंधित अधिकाऱयांवर कठोर कारवाई करू, असा इशारा देखील देण्यात आला.

प्रजासत्ताकदिन साजरा करण्याबाबत जिल्हाधिकाऱयांनी बैठक बोलविली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. पाच स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्याचेही ठरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त सरकारी कार्यालयावर विद्युतरोषणाई करावी, जिल्हा क्रीडांगणावर व्यासपीठाबरोबरच मंडपाची उभारणीही करावी, अशा सूचना करण्यात आल्या. पोलीस, एनसीसी छात्र यांचे पथसंचलनही होणार आहे.

 ध्वजारोहणासाठी पालकमंत्र्यांबरोबरच जिल्हय़ातील सर्व खासदार व लोकप्रतिनिधींना आमंत्रण द्यावे. याचबरोबर विद्यार्थी आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱयांना याबाबत माहिती द्यावी. प्रजासत्ताकदिनी सर्व सरकारी कर्मचाऱयांनी जिल्हा क्रीडांगणावर वेळेत उपस्थित रहावे, असेही सांगण्यात आले. विशेष बसची सोय करावी. याचबरोबर पाणी आणि नाष्टा याची सोय करण्यासाठी सूचना करण्यात आल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी, अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी आदी उपस्थित होते.

Related Stories

भैरती बसवराज यांच्या राजीनाम्यावरून काँग्रेस आक्रमक

Amit Kulkarni

शेतकरी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये

Patil_p

बांधकाम कामगारांना तातडीने रेशन किट द्या

Amit Kulkarni

मजगाव येथे डेंग्यूचा दुसरा बळी

Patil_p

हिंडलगा भागात तीन तास वीज गुल

Amit Kulkarni

रविवारी 424 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p