Tarun Bharat

तिरंदाजीत राकेशकुमारला सुवर्णपदक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दुबईत सुरू असलेल्या फेझा विश्व मानांकन तिरंदाजी स्पर्धेत भारताचा  तिरंदाज राकेशकुमारने कंपाउंड प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. तसेच रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या हरविंदर सिंग आणि पुजा यांनीही सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

पुरूषांच्या कंपाउंड प्रकारात राकेशकुमारने आपल्याच देशाच्या शामसुंदरचा 143-135 गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. रिकर्व्ह मिश्र सांघिक प्रकारात हरविंदर आणि पुजा यांनी तुर्कीच्या संघावर विजय मिळवीत सुवर्णपदक घेतले. कंपाउंड मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या शामसुंदर आणि ज्योती बलियान यांनी रौप्यपदक पटकाविले. या स्पर्धेत 11 देशांचे 70 तिरंदाज सहभागी झाले आहेत.

Related Stories

ईस्ट बंगाल संघाच्या निर्णयाविरुद्ध फुटबॉलपटू संघटना नाराज

Patil_p

हीथ स्ट्रीकवर 8 वर्षांची बंदी

Patil_p

भारताचा माजी फुटबॉल कर्णधार कार्लटन चॅपमन कालवश

Omkar B

भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत

Patil_p

दोन स्वतंत्र संघ निवडण्याचा अनिल कुंबळेंचा सल्ला

Patil_p

‘शॉकिंग एक्झिट’!

Patil_p