Tarun Bharat

तिरुपति विमानतळावर वाद, चंद्राबाबू ताब्यात

Advertisements

रोखल्यावर जमिनीवर बसून दर्शविला विरोध – आचारसंहितेमुळे मिळाली नव्हती अनुमती

वृत्तसंस्था/ तिरुपति

तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडु यांना रानीगुंटा पोलिसांनी तिरुपति विमानतळावर ताब्यात घेतले आहे. चित्तूर जिल्हय़ातील निवडणूक प्रचाराच्या स्वतःच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना विमानतळावर रोखले आहे. यावेळी नायडू हे पोलिसांसोबत वादावादी करताना दिसून आले आहेत. तरीही नायडू यांना जाऊ न देण्यात आल्याने ते विमानतळावरील जमिनीवर बसून राहिले.

यादरम्यान एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने माजी मुख्यमंत्र्यांना त्यांचा कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले. चित्तूर जिल्हय़ात तेदेप अध्यक्ष पुलिवर्थी वेंकटमणी प्रसाद यांच्याकडून एका निदर्शनाचे आयोजन करण्यात येणार होते, ज्यात नायडू सामील होणार होते. पण पोलिसांनी याची अनुमती नाकारली होती. चित्तूरमध्ये सोमवार सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत निदर्शनांचे आयोजन करण्यात येणार होते.

महामारी अन् आचारसंहिता

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांच्या अंतर्गत अधिक संख्येत लोक एकत्र येण्यास अनुमती नाही. तसेचे स्थानिक निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. हा केवळ प्रचाराचा कार्यक्रम नसून त्याचे स्वरुप तीव्र होण्याची शक्यता असल्याने याला अनुमती दिली जाऊ शकत नसल्याचे पोलीस अधिकाऱयाने म्हटले आहे.

Related Stories

बिहार : तीन महिलांना डायन म्हणत जमावाकडून मारहाण, विवस्त्र करून काढली धिंड

Rohan_P

राजोरीत दहशतवाद्यांच्या गटाला घेरले

datta jadhav

पंतप्रधान मोदींचे निसर्गप्रेम झळकले

Patil_p

हिजाब प्रकरणी त्वरित सुनावणीस नकार

Patil_p

सांबामध्ये संशयित ड्रोनच्या घिरट्या

datta jadhav

आरोपींच्या सुटकेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

Patil_p
error: Content is protected !!