Tarun Bharat

तिरुपती बालाजी दर्शन ऑनलाईन बुकिंग करताय ! जरा थांबा आधी ही बातमी वाचा

Advertisements

कोल्हापूर / ऑनलाईन टीम

तिरुपती बालाजी अर्थात व्यंकटेश्वराचे दर्शन ऑनलाईन बुकिंग करत असाल, तर जरा थांबा ! करत भाविकांची यात फसवणूक होऊ शकते. कोरोनामुळे अनेक भाविक तिरुपती बालाजीचे दर्शन मिळण्यासाठी ऑनलाईन बुकिंग करत आहेत. त्यामुळे अनेक भाविकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कारण बुकिंग करण्यासाठी काही बनावट वेबसाईट तयार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाविकांनी ऑनलाईन दर्शन बुक करत असताना काळजी घेणे गरजेचे आहे.

संपूर्ण भारतातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी अनेक जण ऑनलाईन पर्याय निवडतात. यापूर्वी प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या अधिक होती. तर स्पेशल दर्शनच्या माध्यमातून अनेक जण दर्शन घेत होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिरुपती देवस्थान समितीने महत्वपूर्ण निर्णय घेत दर्शनावर काही निर्बंध घातले आहेत. भाविकांना दर्शनासाठी प्री-बुकिंग बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच बुकिंग असेल तरच दर्शनासाठी डोंगरावर सोडले जात आहे. शिवाय कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस किंवा कोरोना अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. बुकिंग असल्याशिवाय तिरुमल्ला येथे सोडले जात नाही. त्यामुळे अनेक भाविक दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगचा पर्याय निवडताना दिसत आहेत. यावेळी मंदिर प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईट वरून दर्शन बुकिंग सुरु आहे. मात्र काहींनी या दर्शनासाठी बनावट वेबसाईट तयार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाविकांनी सतर्क राहून दर्शन बुक करावे असे आवाहन करण्यात आले आहे .

Related Stories

विद्या मंदिर कणेरीवाडी राज्यासाठी रोल मॉडेल बनवणार

Abhijeet Shinde

कर्नाटक: सीआयडी विभागाच्या डीवायएसपी लक्ष्मी व्ही. यांची आत्महत्या

Abhijeet Shinde

गंध फुलांचा गेला सांगून….

Abhijeet Shinde

माजी खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी करणार भाजपप्रवेश

Patil_p

बंदीपोरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

कोल्हापूर : शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची असंमती

Abhijeet Shinde
error: Content is protected !!