Tarun Bharat

तिरुपती विमानसेवा 22 फेब्रुवारीपासून

गोकुळ शिरगाव / वार्ताहर


कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 11 महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर तिरुपती विमान सेवा 22 फेब्रुवारीपासून आठवड्यातील सातही दिवस नेहमीच सुरू होत असून यामुळे कोल्हापूर विमानतळावरील विमानांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.तिरुपती व अहमदाबाद या दोन्ही मार्गावरील विमानसेवा 22 फेब्रुवारीपासून सुरू होत असल्यामुळे प्रदीर्घ काळापासून कोल्हापूर विमानतळावरील विविध शहरांना प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. या विमानसेवेचे बुकिंग इंडिगो एअरलाइन्स च्या संकेतस्थळावर सुरू झालेली आहेत.


कोल्हापूर विमानतळावरून अलाइंस एअर या कंपनीची हैदराबाद व बेंगलोर या शहरांना तर ट्रु जेट कंपनीची मुंबई विमान सेवा सुरू असून इंडिगो एअरलाइन्स या कंपनीची हैदराबाद कोल्हापूर अशी विमानसेवा सुरू आहे. दरम्यान इंडिगो एअरलाइन्स कोल्हापूर तिरुपती विमान सेवा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खंडित झाली होती मुंबई, हैदराबाद व बंगलोर या मार्गावरील विमानसेवा सुरू झाल्या तरीही तिरुपती मंदिर बंद असल्याने प्रवाशांचा तिरुपती विमान विमान सेवा अकरा महीने ही विमानसेवा खंडीत ठेवावी लागली होती. परंतु तिरुपती मंदिर प्रवेश व दर्शन सुरू झाल्यानंतर पुन्हा कोल्हापूर तिरुपती विमान सेवा इंडिगो एयरलाइंस कडून सुरू करण्यात येत असून २२ फेब्रुवारीपासून दुपारच्या सत्रामध्ये आठवड्यातील सातही दिवस ही विमानसेवा सुरु होत आहे. त्याचबरोबर २२ तारखेपासूनच इंडिगो एअरलाइन्स ची या कंपनीची कोल्हापूर अहमदाबाद नवीन मार्गावरील विमानसेवाही आठवड्यातील तीन दिवस सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी सुरू होत आहे. यामुळे कोल्हापूर विमानतळावरून दिवसाला १२ विमानांचे आवागमन होणार असल्याने कोल्हापूर विमानतळावरील विमानांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

तिरुपती विमानसेवेचे वेळापत्रक

तिरुपती विमानतळावरून दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी टेक-ऑफ तर दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी कोल्हापूर मध्ये लॅन्डींग , पुन्हा सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावरून तिरुपतीसाठी टेक-ऑफ तर ५ वाजून ३५ मिनिटांनी तिरुपती विमान तळावर लँडिंग होईल.

Related Stories

मुलीच्या वाढदिनी कोविड सेंटरला रुग्णवाहिका

Archana Banage

कोल्हापूर : मृत वृद्धेच्या अंगावरील दागिन्यांवर डल्ला

Archana Banage

रांगणा किल्ल्यावर तोफा दिमाखदार सोहळ्याने झाल्या आरुढ

Archana Banage

चिखलीकरांच्या मदतीमुळे माणुसकी जिवंत राहिल्याचे अधोरेखित : जिल्हाधिकारी देसाई

Archana Banage

कोल्हापूरचा दिव्यांग जलतरणपटू स्वप्निल पाटीलला अर्जुन पुरस्कार

Kalyani Amanagi

शहरातील सर्व दुकाने आजपासून सम-विषम तारखांना उघडणार

Archana Banage