Tarun Bharat

तिळारीच्या मुख्य कालव्यात पाच गवेरेडे कोसळले

पेडणे / प्रतिनिधी

पेडणे तालुक्मयातील हसापूर हणखणे दरम्यान तिळारीच्या मुख्य कालव्यात पाच गवेरेडे पडले. पेडणे येथील वन विभागीय कार्यालयाचे अधिकारी गिरीश बैलुटकर  यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱयांनी त्या गव्यांना कालव्यातून वर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यातील एक म्हैस आपोआपच वर चढली आणि रानात पळाली.

     चांदेल – हसापूर ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष मळिक यांनी ही  माहिती  पेडणे वन खात्याच्या अधिकार्यांना फोनवरून दिली. खबर मिळताच पेडणे  वन खात्याचे अधिकारी गिरीश बैलुटकर यांनी  कर्मचाऱयांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सोबत रेस्क्मयू संघटनेचे कर्मचारी गवेरेडे वर काढण्यासाठी प्रयत्न करत होते.

    पाणी पिण्यासाठी आलेल्या रानटी जनावरांना पुन्हा वर चढणे सिमेंट काँक्रीटमुळे कठीण जाते. कालव्यातून वर चढण्यासाठी अन्य सोय नसल्याने रानटी जनावरे कालव्यातच अडकून पडतात. यापूर्वी ही अनेक जृनावरे या कालव्यात पडली होती.   दरम्यान चांदेल – हसापूर पंचायतीचे सरपंच संतोष मळिक यांनी कालव्यात वर चढण्यासाठी डब्ल्यू. आर. डी खात्याच्या अधिकार्यांनी व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.

    ही रानटी जनावरे कधी कालव्यात पडली. याची कल्पना कोणालाही नाही. दुपारी ही गोष्ट सरपंच मळिक यांना समजली. त्यांनी ही खबर वन खात्याच्या अधिकार्यांना दिली. त्यानंतर कार्यवाही सुरू केली . राञी उशीरापर्यंत ही कार्यवाही सुरु होती.

Related Stories

काँग्रेसला मतमोजणीपूर्वीच स्वतःची हार मान्य

Amit Kulkarni

वळवईतील ‘अपना नंदू’ची अनोखी समाजसेवा

Omkar B

गोमंतक बहुजन महासंघाचा सुदिन ढवळीकरांना विरोध

Amit Kulkarni

राज्यात 15 दिवस सक्तीचे लॉकडाऊन करा : संजय बर्डे

Omkar B

नीलेश काब्राल यांची उमेदवारी दाखल

Amit Kulkarni

डिचोलीत मंगळवारी कोरोनाचे 16 रुग्ण : एकूण 225 सक्रिय रुग्ण

Amit Kulkarni