Tarun Bharat

तिसऱ्या उद्रेकासंबंधी अनेक गैरसमज

एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरियांचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

कोरोनाचा संभाव्य तिसरा उद्रेक हा लहांना मुलांसाठी घातक ठरणार आहे, हा केवळ एक समज असून तसा कोणताही पुरावा आढळलेला नाही, असे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिले आहे. विनाकारण भीतीचे वातावरण कोणी निर्माण करू नये. संशोधक आणि तज्ञ यांनी दिलेल्या माहितीवरच विसंबून असावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

सध्या देशाच्या काही भागात पसरलेल्या बुरशी संसर्गाला ‘ब्लॅक फंगस’ हे नाव दिलेले असले तरी ते योग्य नाही. ही बुरशी (फंगस) काळय़ा किंवा पांढऱया रंगाची नसते. याचा संसर्ग झालेला शरीराचा भाग, विशेषतः त्वचा रक्ताचा पुरवठा व्यवस्थित न झाल्याने काळी पडते, म्हणून याला ब्लॅक फंगस किंवा काळी बुरशी असे नाव दिले गेले. तथापि ते शास्त्रीय नाव नाही, हे त्यांनी निदर्शनास आणले.

ब्लॅक फंगसची कारणे

ज्यांना कोरोनातून बरे होण्यासाठी स्टीरॉईडयुक्त औषधे मोठय़ा प्रमाणात दिली गेली आहेत, किंवा ज्यांनी अन्य रोगांसाठी ही औषधे प्रदीर्घ काळ घेतली आहेत, किंवा ज्यांना मधुमेह (डायबेटिस) जास्त प्रमाणात आहे, त्यांना विविध प्रकारच्या बुरशींचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून अशा लोकांनी जास्त दक्षता बाळगावयास हवी, अशी महत्वाची सूचनाही त्यांनी केली.

Related Stories

पत्नी गरोदर राहताच पती करतो दुसरा विवाह

Patil_p

जग चिंतेत मात्र चीनने तालिबान पुढे केला मैत्रीचा हात

Archana Banage

अफगाणिस्तान परिषदेसाठी रशिया, अन्य देश येणार

Patil_p

गायक भूपिंदर सिंग यांचे मुंबईत निधन

Patil_p

सत्येंद्र जैन यांना जेलमध्ये VIP ट्रिटमेंट, व्हिडिओ व्हायरल

datta jadhav

भारतात प्रतिनिधी नियुक्तीसाठी तालिबान इच्छुक

Amit Kulkarni