Tarun Bharat

तिसऱया दिवशी देखील सातारा कडकडीत बंद

Advertisements

ओस रस्ते अन उन्हाचा तडाखा : आदेश मोडणाऱयांच्या अँटीजन टेस्ट

प्रतिनिधी / सातारा

सातारा शहर व परिसरात सलग तिसऱया दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व प्रवेशद्वारांवर बंदोबस्त तैनात असून बाहेरुन येणाऱयांची कसून चौकशी केली जात आहे. तर शहरात देखील अत्यावश्यक सेवेतील वाहन वगळता  निर्मनुष्य झालेले रस्ते ओस पडले आहेत. अगदी रात्रीच्या वेळी देखील सर्व शहर सुनसान होत असून गुरुवारी रस्त्यावर आलेल्या नागारिकांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर मग दिवसभर शहरातील रस्ते सुनसान झाले.

शहरातील राजवाडा, मोती चौक, कमानी हौद, शनिवार चौक, पोवईनाका, बसस्थानक परिसर, बाँबे रेस्टारंट चौक, वाढे फाटा चौक, मोळाचा ओढा यासह अनेक पाँईटसवर पोलीस दलाकडून बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे बाहेरील कोणीही साताऱयात विनापरवानगीचे सध्या येवू शकत नाही ईपास असेल तरच त्यांची टेस्ट निगेटिव्ह असेल तर आत प्रवेश दिला आहे. रात्रंदिवस पोलीस दलाकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

रस्त्यावर विनाकारण फिरणाऱयांची चौकशी करण्याबरोबरच काही ठिकाणी पोलीस दल व आरोग्य विभागाकडून या फिरणारांची अँटीजन टेस्ट करण्यात येत आहे. अनेकांनी या टेस्टचा धसका घेवून घरात बसणे पसंद केले आहे. मात्र, रात्रीच्या वेळी देखील शहरात मोकळय़ा जागांमध्ये ओपन बार भरत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पोलीस रस्त्यावर नागरिक घरात

सध्या पुन्हा वर्षभरानंतर पोलीस दल रस्त्यावर आहे. नागरिक आपापल्या घरात बसून आहेत. वैद्यकीय कारणांसाठी बाहेर पडणाऱयांना जावू दिले जात आहे. मात्र, शहरातील वर्दळ पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्हाभरातून कोव्हिड हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलसह खासगी हॉस्पिटलमध्ये येणाऱया रुग्णाबरोबर एकाच नातेवाईकास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सातारा शहरात होणारी बाहेरील गर्दीही आटोक्यात आली. उर्वरित दिवसात असाच कडक लॉकडाऊन पाळून तरी बाधित वाढ आटोक्यात यावी, अशी प्रार्थना नागरिक करत आहेत.

तालुका पोलीस ठाणे पडले ओस

सातारा तालुका पोलीस ठाण्यातील आठ कर्मचारी बाधित आल्यानंतर सर्वांचीच टेस्ट करण्यात आली आहे. त्यातील अनेकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सुटकेचा निश्वास टाकला असला तरी जीवावर उदार होवूनच पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. कर्मचारी 12-12 तासांच्या डय़ुटी करत असून अधिकाऱयांना देखील कडक लॉकडाऊन यशस्वी करण्याच्या सूचना असल्याने अधिकारी तर 24 तास अर्लट आहेत. तालुका पोलीस ठाण्यात कर्मचारी बाधित आल्याने मात्र पोलीस ठाणे तक्रारदाराविना ओस पडले होते.

जीम सुरु ठेवल्याने 8 जणांवर गुन्हे

शाहूपुरी पोलिसांनी अर्कशाळानगर येथील फिटनेस फास्ट जीम सुरु ठेवल्याप्रकरणी व जीमध्ये व्यायाम करणाऱया रोहन प्रकाश घोरपडे (रा. मंगळवार पेठ, सातारा), यश सचिन शिंदे, (रा. रांगोळे कॉलनी, शाहूपुरी), आदित्य जयंत काटे (रा. प्रतापगंज पेठ, सातारा), गौरव प्रसाद माजगावकर (रा. शुक्रवार पेठ, सातारा), अजिंक्य रमेश अडसूळ (रा. शाहूपुरी), केतन चंद्रकांत शिंदे, (रा. सोमवार पेठ, सातारा), दर्शन देशपांडे (रा. शाहूपरी), विश्वजित विजय माने (रा. अजंली कॉलनी, शाहूपुरी), यांच्यावर कारवाई केली. त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याविरुध्द कॉन्स्टेबल मोहन पवार यांनी तक्रार दिली आहे. हवालदार यादव अधिक तपास करत आहेत.

Related Stories

आमदार जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा

datta jadhav

व्यकंटपुऱ्याचा पाणी प्रश्न मिटलाः महादरे तळे ओसांडून वाहू लागले

Abhijeet Khandekar

वृद्धाश्रमातील ‘वयोवृद्ध’ लसीकरणापासून वंचित

datta jadhav

झेडपीत ओळखपत्र पाहूनच प्रवेश

Patil_p

वडूज येथे पाच लाखाची दारू जप्त

Patil_p

सातारा : हिरापूरच्या विद्यार्थ्यांना मिळाला ‘त्यांचा’ मदतीचा हात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!