Tarun Bharat

तिसऱया दिवशी शेअर बाजारात तेजीचे वारे

आरबीआयच्या घोषणेचा परिणाम- लुपिन फार्मा सर्वाधिक नफ्यात

वृत्तसंस्था/ मुंबई

फार्मा कंपन्यांच्या समभागांच्या जोरावर भारतीय शेअर बाजारात आज तेजीचे वारे पाहायला मिळाले. सेन्सेक्सचा निर्देशांक 424 अंकांच्या वाढीसह आणि निफ्टी निर्देशांक 121 अंकांच्या वाढीसह बंद झाला आहे.

बुधवारी शेअर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आले होते. सरतेशेवटी सेन्सेक्सचा निर्देशांक 424 अंकांच्या तेजीसह 48,677.55 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 121 अंकांच्या वधारासह 14,617.85 अंकांवर बंद झाला. फार्मा कंपन्यांच्या समभागांची मोठी खरेदी बुधवारी दिसली तर फार्मा क्षेत्रातील लुपिनच्या समभागांनी 14 टक्क्यापर्यंत उसळी घेतल्याचे दिसून आले. दरम्यान सकाळी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी दुसऱया लाटेच्या परिस्थितीचा आढावा घेऊन तरलतेसाठी आवश्यक मदतीच्या घोषणा केल्याने याचे सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आले.

फार्मा आणि बँकिंग समभाग तेजीत

गुंतवणूकदारांनी सर्वाधिक खरेदी ही फार्मा आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांची केल्याचे दिसले आहे. फार्मा निर्देशांकात लुपिनचा समभाग तर 13 टक्के वाढून बंद झाला होता. सन फार्माच्या समभागातही 6 टक्क्यांची उसळी दिसली.

शेअर बाजारात बुधवारी तिसऱया दिवशी खरेदीला जोर दिसला. सेन्सेक्स एकावेळी 190 अंकांच्या वाढीसह 48,443 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 50 अंकांच्या वाढीसह 14,547 अंकांवर व्यवहार करत होता. गुंतवणूकदारांनी फार्मा व सरकारी बँकांच्या समभागांच्या खरेदीवर अधिक जोर दिल्याचे दिसून आले.

सेन्सेक्समधील 30 पैकी 23 समभाग तेजीत होते. सन फार्माचे समभाग 3 टक्क्मयांनी तेजीत होते. तर डॉक्टर रेड्डीचे समभाग 2 टक्के तेजीत होते. टीसीएस, रिलायन्स, एसबीआय, भारती एअरटेल व इन्फोसिस यांचे समभागही तेजीत होते. बजाज फायनान्सचे समभाग मात्र 2 टक्क्यांनी घसरल्याचे दिसले.

बीएसईवर 2855 समभागांमध्ये व्यवहार होत होता. ज्यात 1627 समभाग तेजीसह व्यवहार करत होते. ओएनजीसीचे समभाग 3 टक्के वाढले होते. टायटन व इंडसइंड बँक यांचे समभाग तेजी दर्शवत होते. एचडीएफसी, बजाज ऑटो मात्र तोटय़ामध्ये होते. बाजारात लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 207.85 लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते.

इतर बाजारांमध्ये जपानचा निक्केई निर्देशांक 241 अंकांच्या घसरणीसह 28, 812 वर व्यवहार करत होता. चीनचा शांघाई कंपोझिट निर्देशांक 1 अंकांच्या घसरणीसह 3472 वर बंद झाला. हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक 266 अंकांच्या वधारासह व्यवहार करत होता. सकाळी 10.58 मिनिटांनी सेन्सेक्स निर्देशांक 300 अंकांच्या वाढीसह 48,553.56 वर तर निफ्टीचा निर्देशांक 90 अंकांच्या वाढीसह 14,586 वर व्यवहार करत होता. आरोग्य क्षेत्रातील 30 पैकी 21 कंपन्यांचे समभाग तेजीत होते तर ऑटो निर्देशांकात 15 पैकी 8 कंपन्यांचे समभाग तेजी दर्शवत होते.

Related Stories

एलआयसीचे नव्या प्रीमियममधून उत्पन्न वाढले

Patil_p

चालू आर्थिक वर्षात निर्यात 410 अब्ज डॉलर्सवर पोहोचणार

Patil_p

औषध निर्यात 15 टक्के वाढली

Patil_p

शेअर बाजाराची आठवडय़ाची सुरुवात तेजीने

Patil_p

वन प्लसचे स्मार्टवॉच 21 एप्रिलला बाजारात

Patil_p

2022 मध्ये देशात विक्रमी कार्सची विक्री

Patil_p