Tarun Bharat

तिसऱया दिवशी सेन्सेक्सची 529 अंकांची उसळी

रिलायन्स, एचडीएफसी-आयसीआयसीआय नफ्यात : निफ्टी 13,749.25 वर स्थिरावला

वृत्तसंस्था / मुंबई

मागील आठवडय़ापासून भारतीय भांडवली बाजार नवीन विक्रमाची नोंद करत आहे. चालू आठवडय़ात सोमवारच्या बाजारातील घसरणीचा अपवाद वगळता बाजाराने नंतर आपली घोडदौड कायम ठेवल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये सलगची तेजी प्राप्त करत तिसऱया दिवशी गुरुवारी बीएसई सेन्सेक्स 529.36 अंकांनी मजबूत होत बंद झाला आहे.

दिवसभरातील व्यवहारामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फायनान्शिअल समभागांच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 529.36 अंकांनी वधारुन निर्देशांक 46,973.54 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 148.15 अंकांनी वधारुन निर्देशांक 13,749.25 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्स बंदच्या दरम्यान निर्देशांक सर्वोच्च पातळीवर राहिला आहे. या अगोदर 18 डिसेंबर रोजी सेन्सेक्सने 46,960.69 चा टप्पा पार केला होता. साधारणपणे इंट्राडेमध्ये निर्देशांकाने 47,053.40 चा उच्चांक गाठला होता. या अगोदर 21 डिसेंबरमध्ये निर्देशांकाने 47,055.69 स्तर राखला होता.

प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमध्ये सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 2.58, एचडीएफसी बँक 1.56, एचडीएफसी 2.17, ऍक्सिस बँक 3.04 आणि  सन फार्मा 2.67 टक्क्यांच्या वाढीसह मजबूत स्थितीमध्ये राहिले आहेत.

गुरुवारी सेन्सेक्स वाढीस रिलायन्स, एचडीएफसी, बजाज, स्टेट बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या समभागांनी शेअर बाजाराला सावरल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. बाजारामध्ये एकूण 3,123 कंपन्यांच्या समभागांमध्ये व्यवहार झाला. यामध्ये 1675 कंपन्यांचे समभाग वाढीसह आणि 1,272 समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.

दुसऱया बाजूला इन्फोसिस, इंडसइंड बँक, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया आणि टेक महिंद्रा यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.

Related Stories

‘कोविड अलर्ट’ ऍप लॉन्च

Patil_p

ट्विटरचे सीईओ डॉर्सी 28 टक्के संपत्ती करणार दान

Patil_p

टॅव्हल, पर्यटन-विमान उद्योगातील रोजगार धोक्यात?

Patil_p

मार्चमध्ये डिजिटल पेमेंटचे प्रमाण 46 टक्क्यांनी घटले

Patil_p

सोने खरेदी महागणार!

datta jadhav

‘जिओ’ची जिओमार्ट वेबसाईट सुरू

Patil_p