Tarun Bharat

तिसऱया फेरीतही आनंदचा पराभव

क्रॅमनिकने केली मात, कार्लसन-स्विडलर तीन विजयासह संयुक्त आघाडीवर

वृत्तसंस्था/ चेन्नई

भारताचा माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदला चेस 24 लेजेंड्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱया फेरीतही पराभवाचा धक्का बसला. रशियाच्या ब्लादिमिर क्रॅमनिककडून या फेरीत त्याला पराभव स्वीकारावा लागला.

क्रॅमनिकने या लढतीत आनंदवर 2.5-0.5 अशा गुणांनी मात केली. आनंदला पहिल्या दोन फेऱयात स्विडलर व कार्लसन यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते आणि तिसऱया फेरीतही त्याला ही मालिका खंडित करता आली नाही. पहिल्या फेरीत स्विडलरविरुद्ध त्याने चमकदार प्रदर्शन केले होते. पण नंतर स्विडलरने झुंजार खेळ केला. दुसरा डाव गमविल्यानंतर आनंद बॅकफूटवर गेला आणि तिसरा डाव अनिर्णीत राहिल्यानंतर त्याची आशा संपुष्टात आली होती. मॅग्नस कार्लसन चेस टूरमध्ये आनंद पहिल्यांदाच सहभागी झाला असून तिसऱया फेरीअखेर कार्लसन  व स्विडलर संयुक्त अग्रस्थानावर आहेत. त्यांनी तीन विजयांसह 9 गुण मिळविले आहेत.

जागतिक तृतीय मानांकित डिंग लिरेनचा संघर्षही पुढे चालू राहिला असून 1.5-0.5 आघाडी मिळविल्यानंतरही त्याला युक्रेनच्या व्हॅसील इव्हान्चुककडून पराभूत व्हावे लागले. आनंद व लिरेन गुणतक्त्यात तळाच्या स्थानी असून आनंदची पुढील लढत नेदरलँड्सच्या अनिश गिरीशी होणार आहे. गिरीला तिसऱया फेरीत नेपोमनियाचीकडून पराभव स्वीकारावा लागला तर कार्लसनने पीटर लेकोला आणि स्विडलरने बोरिस गेलफँडला याच गुणफरकाने हरविले. या राऊंड रॉबिन स्पर्धेतील प्रत्येक फेरीत चार डाव खेळले जात आहेत. लेजेंड्स बुद्धिबळ स्पर्धेत कार्लसन, लिरेन, नेपोमनियाची, गिरी यांनी चेसेबल मास्टर्स स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली असल्याने त्यांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. त्यांना सहा 40 ते 52 वयोगटातील लेजेंड्स बुद्धिबळपटूंविरुद्ध मुकाबला करावा लागत आहे. या स्पर्धेतील विजेता या टूरच्या ग्रँड फायनलसाठी पात्र ठरणार असून ही स्पर्धा 9 ते 20 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. अंतिम स्पर्धेसाठी 3 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

तिसऱया फेरीचे निकाल : क्रॅमनिक वि.वि. आनंद 2.5-1.5, इव्हान्चुक वि.वि. डिंग लिरेन 2.5-1.5, इयान नेपोमनियाची वि.वि. अनिश गिरी 2.5-1.5, कार्लसन वि.वि. पीटर लेको 2.5-1.5, स्विडलर वि.वि. गेलफँड 2.5-1.5.

Related Stories

प्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव यांचे निधन

datta jadhav

पाच राज्यांमधील निवडणुका टळणार ?

Patil_p

नियंत्रण रेषेत बदल अशक्य!

Patil_p

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; खत दरवाढ अखेर मागे

Archana Banage

Video : घोड्याच्या अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी; कोरोना नियमांचा फज्जा

Archana Banage

आर्यन खानला क्लीन चिट

Abhijeet Khandekar