Tarun Bharat

तिसऱया रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम वेळेत होणे अशक्मय

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरातील रेल्वेफाटकावर उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. तिसऱया रेल्वेगेटवरील उड्डाणपुलाचे काम जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले आहे. मात्र कामाची गती पाहता हे काम वेळेत पूर्ण होईल का, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रेल्वेफाटकावर उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. यापूर्वी तीन ठिकाणी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच शहरातील चौथ्या उड्डाणपुलाचे काम दोन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले आहे. कोरोनामुळे उड्डाणपुलाच्या उभारणीच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. हे काम सुरू असतानाच कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी या कामासाठी आलेले परप्रांतीय कामगार आपल्या गावी निघून गेले. त्यानंतर उड्डाणपुलाच्या उभारणीचे काम संथगतीने सुरू आहे. वास्तविक पाहता दीड वर्षाच्या आत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण हे काम अद्यापही अपूर्णच आहे. तिसऱया रेल्वेगेट येथे उभारण्यात येणाऱया एका बाजूच्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. येत्या जानेवारीअखेरपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असे कंत्राटदारांकडून सांगण्यात आले आहे. पण सध्या येथील कामे संथगतीने सुरू आहेत.

रेल्वेमार्गाच्या दरम्यान 180 फुटाचा लोखंडी पूल उभारण्यात येणार आहे. सदर काम युद्धपातळीवर सुरू असून लोखंडी स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. येत्या पंधरा दिवसांत हा लोखंडी स्पॅन उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर ठेवण्यात येणार आहे. याकरिता पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे. उड्डाणपुलावरील रस्ता व फुटपाथचे काम सुरू आहे. दोन्ही बाजूंनी रॅम्प बनविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पण हे काम सध्या बंद ठेवण्यात आले आहे. रॅम्पच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. पण कामाची गती पाहता उड्डाणपूल ठरलेल्या वेळेत पूर्ण होण्याची शक्मयता कमी आहे.  

Related Stories

शनिवारीही पावसाची रिमझिम

Patil_p

जिल्हाधिकाऱयांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

Patil_p

…अजूनही बरेच शिकायचे आहे!

Amit Kulkarni

मण्णूर ते गोजगा मार्गावरील पुलाचे काम युध्दपातळीवर

Patil_p

काहेर विद्यापीठाच्या फार्मास्युटिकल्सतर्फे कार्यशाळा

Amit Kulkarni

दोन दवाखान्यांना ठोकले टाळे

Patil_p