Tarun Bharat

तिसऱया लाटेमुळे फ्रान्स ‘लॉकडाऊन’

पॅरिस / वृत्तसंस्था

जगातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्याची नामुष्की अनेक देशांवर ओढवत आहे. फ्रान्समध्येही कोरोनाच्या तिसऱया लाटेमुळे बाधितांमध्ये झपाटय़ाने वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी मर्यादित लॉकडाऊनची घोषणा केली आहे. शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पॅरिससह संसर्ग वाढत असलेल्या देशातील 16 ठिकाणी एका महिन्याच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून चार आठवडय़ांसाठी हा लॉकडाऊन लागू होणार आहे. लॉकडाऊनमध्ये पूर्वीप्रमाणे कठोर निर्बंध नसले तरी दैनंदिन जीवनमानावर त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम जाणवणार आहेत. तसेच अर्थचक्रही मंदावणार असल्याने अर्थव्यवस्थेला दणका बसू शकतो.

नव्या नियमावलीनुसार फ्रान्समधील बहुतांश भागात रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने सुरू ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच नवीन नियमांनुसार जास्तीत जास्त लोकांनी वर्क फ्रॉम होम पर्याय निवडावा असे सांगण्यात आले आहे. तसेच परवानगीपत्र असेल तरच लोकांना घराबाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच कोणालाही आपल्या घरापासून 10 किमीपेक्षा जास्त दूर जाता येणार नाही. फ्रान्समध्ये आतापर्यंत 42 लाखांहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 91 हजार 800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

चीनने बळकावली नेपाळची 33 हेक्टर जमीन

datta jadhav

अर्जेंटीनाच्या उपाध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न

Patil_p

ज्युलियन असांजचे होणार अमेरिकेकडे प्रत्यार्पण

Patil_p

अजरबैजानकडून आर्मेनियावर अग्निबाणांचा वर्षाव

Patil_p

50 वर्षांपासून दररोज खातोय बर्गर

Patil_p

पंजशीरला मान्यतेच्या दिशेने अमेरिका

Patil_p