दिल्लीच्या तिहार तुरुंगात शुक्रवारी सकाळी एका कैद्याने कथितरित्या आत्महत्या केली आहे. 21 वर्षीय गगन तिहारच्या तुरुंग क्रमांक 3 मध्ये कैद होता. सकाळी शौचालयात कथितरित्या गळफास लावून घेत त्याने आत्महत्या केली आहे. गगनला चोरीप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

