Tarun Bharat

तीन कोरोनाबाधित डॉक्टर करताहेत रूग्णसेवा!

Advertisements

चिपळूण कामथे उपजिल्हा रूग्णालयातील प्रकार

प्रतिनिधी/ चिपळूण

एकीकडे कोरोनाबाधितांच्या जवळ जाण्यास नातेवाईकही धजावत नसल्याची उदाहरणे आहेत. याचवेळी स्वतः बाधित असतानाही कामथे उपजिल्हा रूग्णालयात  तीन डॉक्टर व अन्य 5 कर्मचारी रूग्णसेवा करून समर्पित वृत्तीचा आदर्श जपत आहेत. त्यांच्या या कार्याला रूग्ण व त्यांचे नातेवाईकही सलाम करीत आहेत. सध्या येथे 130 रूग्ण उपचार घेत असून त्यांच्या सेवेसाठी केवळ 10 डॉक्टर व 18 कर्मचारीच असल्याने त्यांच्यावर मोठा ताण येत आहे.

कामथे रूग्णालय म्हटले की ताण, सर्दी आणि खोकल्यापलिकडे उपचार मिळत नाहीत, असे चित्र उभे राहते. रूग्णालय प्रशासनासह राजकारण्यांनीच अशी प्रतिमा तयार केली आहे. मात्र हेच रूग्णालय आता कोरोनाबाधितांसाठी वरदान ठरत आहे. गेल्या वर्षभरात येथे 864 जणांनी उपचार घेतले असून त्यातील 657 जण बरे झाले आहेत. सध्या येथे 130 जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र रूग्णावर उपचार करताना मर्यादित संख्येतील डॉक्टर व अन्य कर्मचाऱयांवर सध्या मोठा ताण आला आहे.

येथे प्रत्यक्षात 18 ते 20 डॉक्टरांची गरज असताना त्याच्या निम्मेच म्हणजे फक्त 10 डॉक्टर गेले काही महिने दररोज 12 तासांपेक्षा अधिक वेळ सेवा करीत आहेत. सध्या या 10पैकी 3 डॉक्टर्स स्वतः बाधित झाले आहेत. तरीही डॉक्टरांची अपुरी संख्या लक्षात घेत ते अखंडपणे रुग्णसेवा करीत आहेत. स्वतःच बाधित असल्याने सलग काम न करता थोडी विश्रांती व थोडे काम अशाप्रकारे शक्य ती सेवा देण्याचा ते प्रयत्न करत आहेत. यामुळे उर्वरित 7 डॉक्टर्सवरील ताण आणखी वाढला असूत ते तर दिवस-रात्र काम करीत आहेत. हीच परिस्थिती परिच्नारिका व अन्य कर्मचाऱयांचीही आहे. येथे 30 हून अधिक परिचारिका व कर्मचाऱयांची गरज असताना केवळ 18 कर्मचारी काम करीत आहेत. त्यातील 5 जण कोरोनाबाधित आहेत. तरीही ते आपले कर्तव्य पार पाडीत असल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

निम्मा वेळ वाया

या रूग्णालयात सध्या 130 जण उपचार घेत आहेत. त्यातील काहींचे नातेवाईक रूग्णालयाकडे फिरकतही नाहीत तर काहींचे नातेवाईक रूग्णालय परिसरात गर्दी करीत आहेत. त्यामुळे त्यांना समजावून घरी पाठवण्याबरोबरच अनेकांच्या नातेवाईकांचे दूरध्वनी घेण्यात डॉक्टरांचा निम्मा वेळ वाया जात आहे. त्यातच काही नातेवाईक डॉक्टरांशीच उध्दटपणे वागताना दिसत आहेत. येथील कर्मचाऱयांवरील ताण पाहता सर्वांनी डॉक्टर व अन्य कर्मचाऱयांना सहकार्य करण्याची गरज आहे.

Related Stories

तिलारीचे जंगल ‘संवर्धन राखीव’ जाहीर

NIKHIL_N

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग अद्यापही ठप्पच, दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा

Abhijeet Shinde

‘शिवविवाह’ सोहळय़ात ‘ओबीसींची स्वतंत्र जनगणना’ संदेश

Omkar B

साताऱ्यातील तरूणाचा महामार्गावर आत्महत्येचा प्रयत्न

Abhijeet Shinde

दापोलीत चक्रीवादळातील चोरट्यांवर होणार फौजदारी दाखल; तरूण भारतच्या वृत्ताची दखल

Abhijeet Shinde

औषधांना फुटले पाय, अधिकारी, कर्मचारी दोषी !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!