Tarun Bharat

तीन दानपेट्य़ात 1 कोटी 20 लाख जमा

अंबाबाई मंदिरातील दानपेट्य़ातील रक्कमेची मोजणी सुरू

कोल्हापूर प्रतिनिधी

करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात असलेल्या दानपेटय़ांत भाविकांनी दान केलेल्या रकमेची मोजदाद करण्याची प्रक्रिया गरूड मंडपात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सोमवारी सुरू केली. बुधवारपर्यंत तीन दानपेटय़ातील रक्कम मोजण्यात आली. त्यामधून 1 कोटी 20 लाख रूपयांची रक्कम देणगीरूपात प्राप्त झाली आहे. उर्वरीत चार दानपेटय़ांतील रकमेची मोजणी शुक्रवार 25 मार्च पर्यंत सुरू राहणार असून त्यानंतर देणगीची एकूण रक्कम किती असणार? हे स्पष्ट होणार आहे.

देवस्थान समितीने जानेवारीत दानपेट्य़ा उघडून त्यात जमा झालेली रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत जमा केली होती. त्यानंतर आता दीड दोन महिन्यांनी पुन्हा दानपेटय़ा उघडून त्यात जमा झालेली रक्कम मोजण्याच्या प्रक्रियेला सोमवारी प्रारंभ करण्यात आला. देवस्थान समितीच्या कर्मचाऱयांसह बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी या प्रक्रियेत सहभागी आहेत. सोमवार ते बुधवारपर्यत तीन दानपेटय़ा उघडून त्यातील रकमेची मोजदाद करण्यात आली. त्यातून 1 कोटी 20 लाख रूपयांची रक्कम जमा झाल्याचे देवस्थान समितीच्या वतीने सांगण्यात आले.
उडण्यात आलेल्या दानपेटय़ात सोने, चांदीचे दागिणेही भाविकांनी जमा केले आहेत. या दागिण्यांचे मूल्यमापनही करण्यात येणार आहे. दरम्यान, उर्वरीत 4 दानपेटय़ातील रक्कम मोजण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवार 25 मार्चपर्यंत चालणार आहे. त्यानंतरच एकूण किती रक्कम देणगीरूपात अंबाबाईच्या चरणी अर्पण झाली हे स्पष्ट होणार असल्याचे देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

भाविक वाढल्याने देणगीतही वाढ
कोरोनाच्या काळात गेल्या दोन वर्षांत निर्बंधांमुळे अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱया भाविकांच्या संख्येवर मर्यादा आल्या होत्या. पण गेल्या चार पाच महिन्यांपासून कोरोना संकट कमी झाल्याने अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. आता तर ई-पास सह इतर निर्बंध देवस्थान समितीने शिथिल केले आहे. मंदिराचे सर्व दरवाजेही खुले आहेत. त्यामुळे भाविक संख्याही वाढली आहे. परिणामी दानपेटय़ातील देणगीतही वाढ झाली आहे.

Related Stories

अपघातातील ‘त्या’ जखमी तरूणाचे निधन

Archana Banage

सांगली : या संकटातून मार्ग काढणारच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त

Archana Banage

प्राथमिक शाळांमधील क्वारंटाईन थांबवावे -शिक्षक समिती राज्य ऑडिटर यांची मागणी

Archana Banage

कोल्हापूर जिल्हय़ात 1309 पॉझिटिव्ह, 53 बळी

Archana Banage

जगभरात मागील 24 तासात 2.60 लाख नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

दिल्ली अनलॉक : 7 जूनपासून धावणार मेट्रो; सम – विषम योजनेनुसार उघडार मॉल आणि दुकाने

Tousif Mujawar