Tarun Bharat

तीन देशांमध्ये त्सुनामीचा धोका

न्यू केलेडोनियामध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप : समुद्रात 3 फुट उंचीच्या लाटा

वृत्तसंस्था / ऑकलंड

न्यूझीलंडच्या दक्षिण भागात असलेल्या न्यू केलेडोनिया बेटावर बुधवारी रात्री 7.7 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. या भूकंपानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजीमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये तीन फुटापर्यंतच्या उंचीच्या लाटा उसळल्या आहेत.

न्यूझीलंड, फिजी आणि वनुअतूमध्ये सर्वाधिक धोका आहे. या भागात अनेक छोटी आणि मोठी बेटे असल्याचे त्सुनामी इशारा केंद्राने म्हटले आहे. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण विभागानुसार भूकंपाचे केंद्र केलेडोनियापासून 415 किलोमीटर अंतरावर समुद्रात 10 किलोमीटर खोलीवर होते.

रिंग ऑफ फायर

न्यूझीलंड, वनुआतू आणि अन्य प्रशांत बेटांमध्ये भूकंपाचा धक्का बसण्याचा धोका कायम असतो. रिंग ऑफ फायर म्हणजेच भूकंपाचा अत्याधिक धोका असलेल्या प्रशांत महासागराच्या क्षेत्रात हा भाग येतो.

फ्रान्ससाठी महत्त्वाचे बेट

दक्षिण प्रशांत महासागरातील न्यू केलेडोनिया बेट फ्रान्सच्या मालकीचे आहे. जगातील एकूण निकेलच्या साठय़ाचे सुमारे 10 टक्के प्रमाण येथेच आहे. निकेल इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये वापरण्यात येते. याचमुळे फ्रान्ससाठी हा भूभाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. चीन या भागात स्वतःचे प्रभुत्व वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. न्यू केलेडोनियाच्या निर्यातीचा मोठा हिस्सा चीनलाच जातो.

Related Stories

‘एफएटीएफ’च्या ग्रे लिस्टमधून पाकिस्तान बाहेर

Patil_p

हैतीमध्ये 17 अमेरिकन मिशनरींचे अपहरण

Patil_p

कोरोना विषाणूची निर्मिती चीनकडूनच !

Patil_p

नोकरी सोडून केवळ चालविते मोबाइल

Amit Kulkarni

द. कोरियात नवे रुग्ण

Patil_p

शिकारीच जेव्हा शिकार होतो…

Patil_p