Tarun Bharat

तीन महिन्यांनी रुग्णसंख्या तिनशेच्या खाली

Advertisements

कोरोना बाधित मृत्यूसंख्याही घटली : नव्याने 292 पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जिल्हय़ात कोरोनाची रुग्ण वाढ कमी झाली असून तीन महिन्यांनंतर प्रतिदिन रुग्णसंख्या तिनशेच्या खाली आली आहे. तसेच मृत्यूसंख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी नव्याने 292 कोरोना बाधित रुग्ण आढळले, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट उसळली आणि कोरोना रुग्ण वाढ सुरू झाली. दररोजची रुग्णसंख्या पाचशेच्या पुढे गेली. पाचशे ते सहाशेच्या पटीत ही रुग्ण वाढ सुरू होती. मागील आठवडय़ात ती पाचशेच्या खाली आली. त्यानंतर शुक्रवारी तिनशेच्या खाली आकडा आला आहे. मृत्यूचे प्रमाणही दरदिवशी दहा ते बारा होते. तेही आता कमी झाले असून शुक्रवारी तीन रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्हय़ात शुक्रवारी नव्याने 292 रुग्ण आढळल्याने कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 42 हजार 295 झाली आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 1 हजार 63 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या आणखी 323 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेल्याने आतापर्यंत 36 हजार 62 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

जिल्हय़ात आता 5 हजार 168 सक्रिय रुग्ण असून यातील 292 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. पैकी 246 रुग्ण ऑक्सिजनवर, तर 46 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

आतापर्यंत साडेतीन लाख कोरोना चाचण्या

जिल्हय़ात 1 जूनपासून कोरोना चाचण्या वाढविल्यामुळे आतापर्यंत साडेतीन लाखपर्यत कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये आरटीपीसीआरच्या 1 लाख 61 हजार 184 चाचण्या झाल्या. त्यात 29 हजार 901 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तर अँटीजनच्या 1 लाख 89 हजार 467 कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यात 12 हजार 783 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली.

शुक्रवारचे पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 66, दोडामार्ग – 09, कणकवली – 53, कुडाळ – 74, मालवण – 26, सावंतवाडी – 20, वैभववाडी – 22, वेंगुर्ले – 22.

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 5148, दोडामार्ग – 2386, कणकवली – 8151, कुडाळ – 8437, मालवण – 6259, सावंतवाडी – 5924, वैभववाडी – 1927, वेंगुर्ले – 3870, जिल्हय़ाबाहेरील – 193.

सक्रिय रुग्ण : देवगड – 609, दोडामार्ग – 210, कणकवली – 885, कुडाळ – 1232, मालवण – 861, सावंतवाडी – 584, वैभववाडी – 240, वेंगुर्ले – 530, जिल्हय़ाबाहेरील – 17.

आजपर्यंतचे मृत्यू : देवगड – 139, दोडामार्ग – 31, कणकवली – 213, कुडाळ – 161, मालवण – 215, सावंतवाडी – 150, वैभववाडी – 67, वेंगुर्ले – 81, जिल्हय़ाबाहेरील – सहा.

शुक्रवारचे मृत्यू : देवगड – एक, कुडाळ – एक, मालवण – एक.

आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट तपासलेले नमुने – शुक्रवारचे 2,385, एकूण 1,61,184. पॉझिटिव्ह आलेले नमुने 29,901. ऍन्टिजन टेस्ट – तपासलेले नमुने आजचे 3,481, एकूण 1,89,467, पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 12,783.

आणखी तिघांचा कोरोनाने मृत्यू

जिल्हय़ात आणखी तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामध्ये देवगड-जामसंडे येथील 65 वर्षीय महिला, कुडाळ-डिगस येथील 54 वर्षीय महिला अशा दोन रुग्णांचा समावेश असून हे बुधवारी दुपारी संपलेल्या 24 तासांतील मृत्यू आहेत. यापूर्वीचा एक मृत्यू असून त्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आलेली नाही.

Related Stories

कडवई रेल्वेस्थानकाची प्रतीक्षा संपली

Patil_p

किरीट सोमय्या यांच्याकडून कुडाळ बस स्थानकाच्या इमारतीची पाहणी

Anuja Kudatarkar

भाजप राबविणार ‘समर्थ बुथ अभियान’

NIKHIL_N

रिफायनरीविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटना विसर्जित

tarunbharat

एसटीचे 400 कर्मचारी कामावर हजर

Patil_p

आठवडाभरात विजबिल माफ करा…अन्यथा ‘मनसे’ स्टाईल आंदोलन

Patil_p
error: Content is protected !!