Tarun Bharat

तीन वर्षांनंतरही त्या 11 जणांचा शोध नाही

 प्रतिनिधी / बेळगाव

माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या 11 जणांचा अद्याप शोध लागला नाही. पोलिसांनी पुन्हा त्यांचा तपास सुरू केला असून त्यांचा ठावठिकाणा माहिती असल्यास नागरिकांनी माळमारुती पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आश्रय कॉलनी-रुक्मिणीनगर येथील श्रीराम माधवराव होन्नावरकर (वय 59)हे गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून बेपत्ता आहेत. तर मुळचे हडलसंग (ता. इंडी, जि. विजापूर व सध्या आश्रय कॉलनी, रुक्मिणीनगर येथील आण्णाप्पा इराप्पा कट्टीमनी (वय 45) हा 20 सप्टेंबर 2017 पासून बेपत्ता झाला आहे.

अशोकनगर येथील मुबारक शब्बीरअहम्मद दोडमनी (वय 37) हा युवक 5 ऑक्टोबर 2017 पासून बेपत्ता झाला आहे. मोटार साकरल आणण्यासाठी गोकाकला जाण्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता. आश्रय कॉलनी-रुक्मिणीनगर येथील गीता सुरेश नाचेरी उर्फ कोंचीकोरवर (वय 45) ही महिला 11 फेब्रारी 2018 पासून बेपत्ता आहे. स्टेशनरी साहित्य विकण्यासाठी म्हणून ती आपल्या घराबाहेर पडली होती.

मुळचा महाव्दार रोड व सध्या सुभाष गल्ली-गांधीनगर येथे राहणारा श्रीधर महावीर मुतगी (वय 38) हा युवक 9 फेब्रुवारी 2018 पासून बेतत्ता झाला आहे. मुळचा फुलबाग गल्ली व सध्या रामतीर्थनगर येथील मल्लिकार्जुन इराप्पा मेलमट्टी (वय 38) हा युवक 26 मार्च 2017 पासून बेपत्ता झाला आहे. पुण्याला जाणार असे सांगून तो आपल्या घराबाहेर पडला होता.

नेगिनहाळ (ता. बैलहोंगल) येथील मडिवाळाप्पा नागाप्पा तपरी (वय 45) हा अय्याप्पा स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून गेला होता. तो अद्याप घरी परतला नाही. अंजनेयनगर येथील वीरसंगाप्पा राचाप्पा चिनीवालर (वय 73) हा वृध्द 5 डिसेंबर 2019 पासून बेपत्ता झाला ओ. गँगवाडी येथील दत्ता गोपाळ पाटील (वय 65) हा वृध्द 1995 ऑक्टोबर पासून बेपत्ता झाला आहे. मात्र 7 पार्च 2017 रोजी कुटुंबियांनी एफआयआर दाखल केली आहे.

हुडको कॉलनी-अशोकनगर येथील इरशाद गौसमोदीन मुजावर (वय 40) हा युवक 24 मे 2019 पासून बेपत्ता झाला आहे. तापरा (जि. बाडमेर, राजस्थान) येथील महेंद्रसिंग रजपूत (वय 27) हा तरुण 16 ऑक्टोबर 2017 रोजी बेळगाव येथून बेपत्ता झाला आहे. कपडे विक्री व्यवहारातून पैसे वसुलीसाठी तो बेळगावला आला होता. या आकरा जणांविषयी कोणाला माहिती असल्यास 0831-2405251 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

न्यायालयाच्या आदेशानुसारच नियम लागू करा

Amit Kulkarni

परप्रांतातून आलेल्या 156 जणांना उचगावसह 14 गावात क्वारंटाईन

Patil_p

विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा

Amit Kulkarni

बेळगाव जिल्हय़ात शुक्रवारी 420 जणांना कोरोनाची लागण

Patil_p

कोल्हापुरातील धरणे आंदोलन यशस्वी करणार

Patil_p

शहापूर परिसरात राबविल्या खबरदारीच्या उपाययोजना

Patil_p