Tarun Bharat

तीन वीज खांब कोसळल्याने संगमेश्वरजवळ महामार्ग ठप्प

वार्ताहर/ संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाजवळ संभाजीनगरकडे जाणाऱया मार्गावरील फणसाचे झाड 33 के.व्ही विद्युतभारीत लाईनवर पडल्याने तीन पोल महामार्गावर कोसळले. विद्युतभारीत लाईन महामार्गावर पसरल्याने सुमारे 1 तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, लोंखडी पोल कार व रिक्षावर पडल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 11.45वा दरम्याने घडली.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या संभाजीनगरकडे जाण्यासाठी पाय वाट आहे. या पाय वाटेवर जुनाट फणसाचे झाड होते. तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे हे झाड उन्मळून पडले. हे झाड महामार्गावरुन जाणाऱया 33 के.व्ही लाईनवर कोसळले. त्यामुळे या ताणामुळे महामार्गावरील सलग तीन पोल तुटून पडले. त्यामुळे लाईन महामार्गावर पसरली. त्यामुळे खबरदारी म्हणून महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली.

यातील एक पोल तुटून कार व रिक्षावर पडल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. संतोष मुंडेकर यांच्या मालकीची ही रिक्षा लॉकडाऊमुळे चालकाने रस्त्याच्या कडेला उभी करुन ठेवली होती. रिक्षाचा वरील भाग केबलमुळे फाटला असून नुकसान झाले आहे. संगमेश्वरचे विद्युत कर्मचारी, पोलीस व ग्रामस्थांनी सुमारे तासाभरात या वायर रस्त्यावरून दूर करून वाहतुक पुर्ववत केली. संगमेश्वर शहर परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे लॉक डाऊनच्या दरम्याने घरी असलेल्यांना आणखीन त्रास सहन करावा लागत आहे.

तरीही नाही सुचले शहाणपण

काही दिवसापूर्वी याच ठिकाणी एक झाड कोसळले होते. त्यावेळी एका कार्यालयाचे नुकसान वगळता मोठा अपघात टळला होता. त्यावेळी येथे जावून इतर झाडांची पहाणी केली असती तर ही घटना टळली असती.

Related Stories

तुतारी एक्स्पेस आजपासून 5 अतिरिक्त डब्यांची धावणार

Kalyani Amanagi

सीआरझेडची ऑनलाईन सुनावणी पूर्ण

NIKHIL_N

आज कोरोना, पुढच्या बैठकीत विकासावर बोलूया!

Patil_p

तुम्ही केलेली मदत वाचवू शकतात बळीरामचे प्राण

Anuja Kudatarkar

दोडामार्गात आणखी एक पाणी पुरवठा वाहिनी

Anuja Kudatarkar

सहा वर्षाच्या चिमुरड्याला मेंदूचा आजार ; शस्त्रक्रियेसाठी दोन लाखाची गरज

Anuja Kudatarkar