Tarun Bharat

तीन हजारांची लाच घेताना वडूजचा सर्कल ताब्यात

प्रतिनिधी/ सातारा

बँकेच्या कर्जाचा बोजा सातबारा उताऱयावर चढवून देण्यासाठी तीन हजाराची लाच घेणारा वडूज (ता. खटाव) येथील सर्कल राजेंद्र मारुती जगताप (रा. सातारा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडला आहे. ऐन कोरोना साथीच्या स्थितीत देखील महसूल विभागातील महाभागाची लाचखोरी थांबत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील एका गावातील शेतकऱयाच्या मुलाला शिक्षणासाठी पैसे लागणार असल्याने त्याने एका बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, त्या कर्जाची नोंद तारण दिलेल्या जमिनीच्या उताऱयावर केल्यानंतरच कर्जाची रक्कम त्या शेतकऱयाला मिळणार होती. त्यामुळे त्याने सातबारा उताऱयावर कर्जाची नोंद घालण्यासाठी तलाठय़ाकडे अर्ज केला होता. त्यानंतर सदर अर्ज पुढील नोंदीसाठी संशयित जगताप याच्याकडे आला होता. मात्र, ती नोंद घालण्यासाठी त्याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून लाच घेताना सर्कल जगताप याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरु होती.

Related Stories

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भिलारला भेट

Patil_p

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी ‘या’ दोन नेत्यांना संधी

Archana Banage

औंधचा लाडका गजराज उर्फ मोती हरपला.

Patil_p

शिवसमर्थ शिल्पाचा आताच वाद नेमका कशासाठी?

Patil_p

मद्यपींची पाऊले परमीटरुम बिअरबारकडे

Patil_p

महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट ! तब्बल 57,074 नवे रुग्ण ; 222 मृत्यू

Tousif Mujawar