Tarun Bharat

तीर्थक्षेत्र जेजुरीला मिळाला थ्री स्टार मानांकनाचा दर्जा

प्रतिनिधी/ सातारा

केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या कचरामुक्त स्पर्धेत जेजुरी शहराला तीन तारांकित (3 स्टार) मानांकन प्राप्त झाले आहे.या स्पर्धेत देशातून 1435 शहरांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी केवळ 141 शहरांना मानांकन प्राप्त झाली असून यापैकी 6 शहरांना पाच तारांकित (5 स्टार) मानांकन व 64 शहरांना तीन तारांकित (3 स्टार) मानांकन तर 71 शहरांना एक तारांकित (1 स्टार ) मानांकन मिळालेली आहेत. देशभरातील 64 शहरांना  3 स्टार मानांकन मिळाले यात जेजुरी शहराचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातुन केवळ 34 शहरांना 3 स्टार मानांकन मिळाले असून त्यामध्ये जेजुरी शहराचा समावेश आहे.  

   2019 च्या स्पर्धेत जेजुरी शहराला 2 स्टार मानांकन मिळाले होते. मागील वर्षीच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न यावर्षी करण्यात आला. 2019 च्या स्पर्धेत शहराला 2 स्टार मानांकन मिळाले होते परंतु यावर्षी 5 स्टार्च उद्दिष्ट ठेवून आरोग्य विभागाने कचरा संकलन, कचरा प्रक्रिया करून खात निर्मिती करणे, जुन्या कच्रयाची शास्त्राsक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, कच्रयाचे वर्गीकरण करणे, खत निर्मिती  करून शिल्लक राहिलेल्या कच्रयाची शास्त्राsक्त पद्धतीने विल्हेवाट लावणेसाठी लँडफिल बनविणे, संपूर्ण शहरात ट्विन्स बिन बसविणे. यासारख्या कामावर भर देऊन सुधारणा केल्याने शहरास 3 स्टार मानांकन मिळाले असे मुख्याधिकारी पूनम कदम यांनी माहिती दिली.  

     या यशस्वी कामगिरीत नोडल अधिकारी अजित बगाडे ,आरोग्य निरीक्षक राजेंद्र गाडवे आरोग्य विभाग प्रमुख प्रसाद जगताप .पालिका ठेकेदार गोपाल मोहरकर  यशश्री चे सर्व कर्मचारी सर्व पक्षीय  नगरसेवक श्री मार्तंड देवसंस्थान    जेजुरीकर नागरिक, सामाजिक संस्था, बचत गट, शाळा, कॉलेज, पत्रकार या सर्वांच्या मोलाच्या सहकार्याने जेजुरी शहराच्या नावलौकिकात भर टाकण्यास सहकार्य केले. याबद्दल संबंध जेजुरीकरांचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांच्या तर्फे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले आहेत 

Related Stories

कन्नडिगांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

Patil_p

भारतीय जनता पार्टी युवती कार्यकारणी जाहीर

Omkar B

सातारा हिल मॅरेथॉनचा रविवारी थरार!

datta jadhav

पालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Patil_p

पोवईनाक्यावर जुगार खेळणारे नऊजण ताब्यात

Patil_p

फडणवीसांच्या त्यागाचा भाजपला अभिमान

Abhijeet Khandekar