Tarun Bharat

‘ती’ ड्रग्ज पार्टी नव्हती : करण जोहर

ऑनलाईन टीम / मुंबई : 


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दिग्दर्शक व निर्माता करण जोहर याला निशाणा बनवले जात आहे. त्यानंतर करण जोहरने एक निवेदन प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले आहे. 


करणने या निवेदनात म्हटले आहे की, 28 जुलै 2019 ला माझ्या घरी झालेल्या पार्टीत कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन झालेले नाही. 

पुढे तो म्हणाला, यापूर्वीही मी बोललो आहे. आजही सांगतो, की माझ्या घरी झालेल्या पार्टीत कुठल्याही प्रकारच्या ड्रग्ज चा वापर झाला नाही. धर्मा प्रॉडक्शनबाबत माध्यमे चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. ज्या दोन लोकांना माझ्या जवळचे सांगितले जात आहे, त्यांचा माझ्याशी वा धर्मा प्रॉडक्शनशी थेट संबंध नाही. मी त्यांना ओळखत नाही. बाहेर ते काय करतात याच्याशी माझा किंवा धर्मा प्रॉडक्शनचा काही संबंध नाही, असे म्हटले आहे. 


मी स्वत: कधीही ड्रग्जचे सेवन केलेले नाही. मी अशा पदार्थांना प्रमोटही करत नाही. त्यामुळे माझ्याविषयी काहीही चुकीचे आरोप किंवा खोटी माहिती पसरवल्यास प्रसारमाध्यमांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे करण जोहरने म्हटले आहे. 

Related Stories

10 जूनला झळकणार ‘जनहित में जारी’

Patil_p

लग्नानंतरचा आलियाचा पहिला लुक व्हायरल

Archana Banage

उर्मिला मातोंडकरांच्या पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ; पंकजा म्हणाल्या

Archana Banage

….तर पत्रकार झाले असते

Patil_p

‘मन उडू उडू झालं’.

Patil_p

हनी सिंहला मेडिकल रिपोर्ट आणि आयटी रिटर्न सादर करण्याचे दिल्ली कोर्टाचे आदेश

Tousif Mujawar