Tarun Bharat

तुटलेला अंगठा जोडला परत

Advertisements

विजया ऑर्थोमध्ये झाली शस्त्रक्रिया

प्रतिनिधी / बेळगाव

यंत्रावर काम करताना बोटे अडकून एका 35 वषीय युवकाचा अंगठा तुटला. येथील विजया ऑर्थो ऍन्ड ट्रॉमा सेंटरमध्ये डॉ. रवी पाटील आणि त्यांच्या सहकाऱयांनी त्या युवकाच्या बोटावर शस्त्रक्रिया करून तो अंगठा पुन्हा जोडला.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, हुबळी येथील 35 वषीय युवकाचा अंगठा 27 जून रोजी यंत्रात सापडून तुटला. डॉक्टरांशी संपर्क करता त्यांनी विजया ऑर्थोमध्ये जाण्याचा सल्ला दिला व तशी पूर्वकल्पना विजया ऑर्थोमध्ये दिली. सदर युवक विजया ऑर्थोमध्ये दाखल होताच 11 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी  अंगठा त्याच्या हाताला पूर्ववत जोडला. डॉ. बी. पाटील, डॉ. विठ्ठल मालवदे, भूलतज्ञ डॉ. श्रीधर काठवटे, डॉ. अभिजित यांच्यासह विवेक, शिवानंद, विशाल आणि विनोद यांचे शस्त्रक्रियेसाठी सहकार्य लाभले. यावेळी डॉ. रवी पाटील म्हणाले, शरीराचा कोणताही भाग असा अचानक तुटला असता तो प्लास्टिक कव्हरमध्ये घालून सहा तासांच्या आत विजया ऑर्थोमध्ये आणल्यास आम्ही शस्त्रक्रिया करून तो अवयव पुन्हा जोडू शकतो. यापूर्वी अशा शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांनी तुटलेला अवयव व्यवस्थित आपल्यापर्यंत घेऊन येणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. रवी पाटील म्हणाले.

Related Stories

कोरोना महामारीमुळे बुरुड समाज सापडला आर्थिक संकटात

Amit Kulkarni

क्लब रोडवरील पथदीप दिवसा सुरू अन् रात्री बंद..

Amit Kulkarni

हुबळी अकादमी ब, एसएजी, बीडीके हुबळी क संघांचे सहज विजय

Amit Kulkarni

राज्यात कोरोनामुळे 28 डॉक्टरांचा मृत्यू

Amit Kulkarni

तालुक्यात विविध ठिकाणी बलिदान मासाला प्रारंभ

Amit Kulkarni

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!